लोकमत न्यूज नेटवर्कमनमाड : लष्करामध्ये कर्तव्य बजावित असताना अंगावर वीज पडून शहीद झालेले जवान मल्हारी खंडू लहिरे यांच्यावर नांदगाव तालुक्यातील कºही या मूळ गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ‘ मल्हारी लहिरे..अमर रहे... अमर रहे !’ च्या घोषणांच्या निनादात साश्रुनयनांनी या वीरास निरोप देण्यात आला. भारतीय लष्कर व जिल्हा पोलीस प्रशासनातर्फेबंदुकीच्या तीन फैरी झाडून सलामी देण्यात आली.गुजरात राज्यातील जामनगर येथे एडीआरटीच्या युनिटमध्ये शस्त्रागाराची सुरक्षा करीत असताना मल्हारी यांचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला. मल्हारी यांच्या निधनाचे वृत्त समजल्यावर सारा गाव शोकसागरात बुडाला. गावचे सर्व व्यवहार बंद करण्यात आले. ग्रामस्थांनी जागोजागी अभिवादनाचे फलक लावत श्रद्धांजली वाहिली.फुलांनी सजविलेल्या लष्करी ट्रकमध्ये मल्हारी यांचे पार्थिव ठेवून गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली. जिल्हा परिषद शाळेच्या मागील पटांगणात आल्यानंतर खासदार डॉ. भारती पवार, आमदार पंकज भुजबळ, माजी आमदार संजय पवार, जिल्हा परिषदेच्या अर्थ सभापती मनीषा पवार, उपनगराध्यक्ष राजेंद्र आहिरे, गटनेते गणेश धात्रक, शिवसेना जिल्हाप्रमुख सुहास कांदे, पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे यांच्यासह पोलीस अधिकारी, माजी सैनिक, लष्करी अधिकारी, महसूल व इतर शासकीय अधिकारी यांनी पुष्पचक्र अर्पण करून मल्हारी लहिरे यांना श्रद्धांजली वाहिली. सार्थक या चार वर्षाच्या मुलाने जवान मल्हारी यांच्या पार्थिवाला मुखाग्नी देताच उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे डोळे पाणावले.हजारोंनी घेतले अंत्यदर्शनमल्हारी लहिरे यांचे पार्थिव कºही गावात आणण्यात आले. मल्हारी यांना अखेरची मानवंदना देण्यासाठी हजारोंचा जनसमुदाय आणि लोकप्रतिनिधी, अधिकारी उपस्थित होते. यानंतर मल्हारी यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी घराजवळ ठेवण्यात आले होते. यावेळी हजारो नागरिकांनी अंत्यदर्शन घेऊन त्यांना आदरांजली वाहिली.
जवान मल्हारी लहिरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2019 12:45 AM
मनमाड : लष्करामध्ये कर्तव्य बजावित असताना अंगावर वीज पडून शहीद झालेले जवान मल्हारी खंडू लहिरे यांच्यावर नांदगाव तालुक्यातील कºही या मूळ गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ‘ मल्हारी लहिरे..अमर रहे... अमर रहे !’ च्या घोषणांच्या निनादात साश्रुनयनांनी या वीरास निरोप देण्यात आला. भारतीय लष्कर व जिल्हा पोलीस प्रशासनातर्फेबंदुकीच्या तीन फैरी झाडून सलामी देण्यात आली.
ठळक मुद्देहजारो नागरिकांनी अंत्यदर्शन घेऊन त्यांना आदरांजली वाहिली.