येवला : जवान नारायण निवृत्ती मढवई यांच्यावर शासकीय इतमामात चिंचोडी बुद्रुक येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अमर रहे अमर रहे, नारायण मढवई अमर रहे!, जब तक सूरज, चांद रहेगा नारायण तेरा नाम रहेगा, भारत माता की जय.... वंदे मातरम...अशा घोषणा देत चिचोंडीकरांनी पार्थिवाला खांदा दिला.नारायण मढवई यांचा हिस्सार येथे शुक्रवारी (दि.११) अपघाती मृत्यू झाला होता. शनिवारी, (दि.१२) दुपारी १ वाजता जवान नारायण मढवाई यांचे पार्थिव पुण्याहून येवला व नंतर रायते मार्गे चिचोंडी गावात दाखल झाले. गावात प्रत्येक घरापुढे सडा रांगोळी काढण्यात आली होती. पार्थिवाची देशभक्तिपर गीताच्या सुरांवर दोन तास अंत्ययात्रा सुरू होती. जवान मढवई यांचे पार्थिव त्यांच्या घरापुढे येताच घरातील सदस्य वडील निवृत्ती मढवई, आई ताराबाई, चुलते साहेबराव मढवई, सोपान मढवई, बंधू बाळासाहेब, भाऊसाहेब, पत्नी सोनाली मढवई, मुलगा कृष्णा, हरीश, बहीण शीला बोरणारे, दाजी संपत बोरणारे, सासरे मच्छिद्र बावके आदींसह कुटुंबातील इतर सदस्यांनी अंतिम दर्शन घेतले. तहसीलदार प्रमोद हिले, उपविभागीय पोलीस अधिकारी समिरर्सिंह साळवे, येवला तालुका आजी-माजी सैनिक संघटना, सैनिक कल्याण बोर्ड नाशिक ४२ आरमार रेजिमेंटचे सुभेदार एस. बी. काळे, भरत निमसे, त्रिदल सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष नवनाथ पगार, नांदगावचे माजी सैनिक संघटना सुभेदार बाजीराव मोहिते, मेजर धनराज बागुल, नायक सुभेदार सावता बाबू काळे, तुषार खताळ, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे स्वीय सहायक बाळासाहेब लोखंडे, नाशिक जिल्हा परिषदेचे कृषी सभापती संजय बनकर, येवला पंचायत समितीचे सभापती प्रवीण गायकवाड, पंचायत समितीचे माजी सभापती संभाजी पवार, सरपंच रवींद्र गुंजाळ यांनी पार्थिवास पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी जळगाव नेऊर येथील लक्ष्य ॲकडमी, गावातील आदर्श माध्यमिक विद्यालय, बनकर पाटील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक म्हणून काम पाहिले. गोरखनाथ खराटे, उत्तम बंड, कानिफनाथ मढवई, मिलिंद गुंजाळ यांनी सूत्रसंचालन केले. शासकीय इतमामात पोलिसांनी हवेत बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिली.
जवान मढवई यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2022 10:57 PM
येवला : जवान नारायण निवृत्ती मढवई यांच्यावर शासकीय इतमामात चिंचोडी बुद्रुक येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अमर रहे अमर रहे, नारायण मढवई अमर रहे!, जब तक सूरज, चांद रहेगा नारायण तेरा नाम रहेगा, भारत माता की जय.... वंदे मातरम...अशा घोषणा देत चिचोंडीकरांनी पार्थिवाला खांदा दिला.
ठळक मुद्देचिंचोडी गाव शोकसागरात : मान्यवरांकडून श्रद्धांजली