शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
3
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
4
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
5
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
6
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
7
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
8
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
9
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
10
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
11
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
12
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
14
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
15
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
16
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
17
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
18
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
19
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
20
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे

शहीद केशव गोसावी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2018 10:18 PM

सिन्नर (नाशिक) : पाकने केलेल्या गोळीबारात शहीद झालेले सिन्नर तालुक्यातल्या शिंदेवाडी (श्रीरामपूर) येथील  केशव सोमगिर गोसावी यांच्यावर आज रात्री ...

सिन्नर (नाशिक) : पाकने केलेल्या गोळीबारात शहीद झालेले सिन्नर तालुक्यातल्या शिंदेवाडी (श्रीरामपूर) येथील  केशव सोमगिर गोसावी यांच्यावर आज रात्री उशिरा शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अखेरचा निरोप देण्यासाठी जमलेल्या हजारो नागरिकांना अश्रू अनावर झाले होते.

ओझर विमानतळावरुन लष्करी वाहनाद्वारे त्यांचे पार्थिव शिंदेवाडी येथे आणण्यात आले. केशव यांचे पार्थिव घरी येताच कुटुंबीय व नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला. सजविलेल्या रथातून केशव यांच्या पार्थिवाची गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली. भारत माता की जय, केशव गोसावी अमर रहे ! या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. महिलांनी अंत्ययात्रेच्या मार्गावर सडासंमार्जन करुन रांगोळ्या काढल्या होत्या. स्मशानभूमी परिसर फुलांनी सजविण्यात आला होता.

अंत्यसंस्कारावेळी पालकमंत्री गिरीश महाजन, जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, खासदार हेमंत गोडसे, आमदार राजाभाऊ वाजे, माजी आमदार माणिकराव कोकाटे, अनिल कदम, प्रांत महेश पाटील, जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन, तहसीलदार नितीन गवळी, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, राहुल आहेर, जिल्हा पोलीस प्रमुख संजय दराडे, सहाय्यक निरीक्षक मोतीलाल वसावे, सहाय्यक गटविकास अधिकारी रत्नाकर पगार यांच्यासह अनेक लोकप्रतिनीधी व शासकीय अधिकारी यांनी गोसावी यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र वाहिले.

टॅग्स :Ceasefire Violationशस्त्रसंधी उल्लंघनPakistanपाकिस्तानIndian Armyभारतीय जवान