नाशिक : कडाक्याच्या उन्हामुळे हैराण झालेल्या नाशिककरांना गुरुवारी मध्यरात्रीपासून वाहणाऱ्या थंड वाºयामुळे दिलासा मिळाला आहे. फनी चक्रीवादळामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, हा गारवा आगामी तीन दिवसांपर्यंत राहण्याची शक्यता आहे.गेल्या आठवड्यात ४२ अंशांपर्यंत पोहचलेल्या नाशिकच्या तापमानाने नाशिककर भाजून निघाले असताना शुक्रवारी तापमान ३४.७ अंशांवर आल्याने नाशिककरांना दिलासा मिळाला. गुरुवारी सायंकाळपासून काहीसे ढगाळ वातावरण आणि गार वाºयाची झुळूक नाशिककर अनुभवत आहेत.ढगाळ वातावरण शक्यफनी चक्रीवादळामुळे अनेक राज्यांमध्ये पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल होऊन गार वारे वाहू लागतील तसेच पुढील दोन दिवसांत शहरात ढगाळ वातावरणाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
‘फनी’ चक्रीवादळामुळे वातावरणात गारवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2019 12:54 AM
कडाक्याच्या उन्हामुळे हैराण झालेल्या नाशिककरांना गुरुवारी मध्यरात्रीपासून वाहणाऱ्या थंड वाºयामुळे दिलासा मिळाला आहे. फनी चक्रीवादळामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, हा गारवा आगामी तीन दिवसांपर्यंत राहण्याची शक्यता आहे.
ठळक मुद्देदिलासा : उष्णतेची लाट होतेय कमी