आडगाव : शेतकºयांकडून शेतीपंपाच्या वीजबिलांची सक्तीची वसुली थांबविण्याचे आदेश दिले असल्याने सक्तीच्या कारवाईचे संकट तात्पुरते थांबले असले, तरी शेतकºयांना गेल्या अनेक महिन्यांपासून येणाºया सदोष वीजबिलांमुळे शॉक बसला आहे. वीजबिलांच्या माध्यमातून लूट केली जात असल्याने महावितरणच्या कर्मचाºयांना शेतकºयांच्या परिस्थितीची जाणीव नाही का, असा संतप्त सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत. म्हसरूळ शिवारातील अनेक शेतकºयांना चालू महिन्यात नियमित येणाºया वीजबिलापेक्षा चारपट हजारो रुपयांची बिले महावितरणकडून देण्यात आली आहेत. महावितरणकडून ग्राहकांना हिताचे आणि सोयीस्कर असणाºया मीटरचा फोटो असलेले वीजबिल देण्याची पद्धत ग्राहकांना संभ्रमात टाकत आहे. महावितरणद्वारे देण्यात येणाºया बिलांवरील फोटो हे अस्पष्ट असल्याने नागरिकांना नेमका आपल्याच मीटरचा हा फोटा आहे का, त्याचे रीडिंग किती याची कल्पना येत नसल्याने महावितरण विरोधात संतापाचे वातावरण आहे. शिवाय काही वीजबिलांचे तर फोटोच काढलेले नसल्याने फोटोची जागा रिक्त असलेले वीजबिल पाठवले जात आहे. महावितरण आपल्या चुका झाकण्यासाठी नवनवीन प्रयोग करत ग्राहकांची लूट करत असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत.बरेच शेतकरी वीजबिल आल्यानंतर ते भरतात. पण किती रीडिंग होते, नंतर किती आले याची शहानिशा करत नाहीत. बिल भरतात किंवा अडचण असल्यास वर्षाचे एकदम रक्कम अदा करतात. पण त्यावेळी मागचे बिल बघत नाहीत. त्यामुळे शेतकºयांची लूट होत असल्याची तक्र ार आहे. चालू महिन्यात अनेक शेतकºयांना सदोष वीजबिल देण्यात आले आहे . त्यावर मीटरचा फोटो नाही किंवा मागच्या बिलाचा कोणताही विचार न करता अव्वाच्या सव्वा बिले देण्यात आली असल्याचे शेतकरी सांगतात. अनेक शेतकºयांच्या बिलांवर बिल आकारणीचे रीडिंगचे आकडेदेखील १८६५, २७९५ देखील सारखेच आहे. त्यामुळे शेतकरी संतप्त असून, लवकरच महावितरण कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत.
संताप व्यक्त : सक्तीची वसुली थांबविण्याच्या आदेशाचे उल्लंघन शेतकऱ्यांना वाढीव वीजबिलाचा ‘शॉक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2018 1:02 AM
आडगाव : शेतकºयांकडून शेतीपंपाच्या वीजबिलांची सक्तीची वसुली थांबविण्याचे आदेश दिले असल्याने सक्तीच्या कारवाईचे संकट थांबले असले, तरी सदोष वीजबिलांमुळे शॉक बसला आहे.
ठळक मुद्देवीजबिलापेक्षा चारपट हजारो रुपयांची बिले महावितरणकडून देण्यात आलीफोटोची जागा रिक्त असलेले वीजबिल पाठवले जात आहे