पिंपळगाव बसवंत : आई व शिक्षकांच्या शिकवणीतून विद्यार्थी संस्काराच्या वाटेवरून प्रगतीच्या दिशेने भरारी घेत असल्याने पालकांनी आपल्या पाल्यास प्रोत्साहन देण्याची गरज असून शिक्षक विद्यार्थाचे सर्व काही असतात त्यामुळे शिक्षकांनी विध्यार्थीना योग्य शिक्षण देणे गरजेचे आहे. चांगले शिक्षण द्या मुले भविष्य घडवतात. भविष्य मंदिराच्या माध्यमातून नाही तर छोट्या छोट्या विद्यालयाच्या माध्यमातून घडत असून देशाचे भविष्य तरु ण पिढीच्या हाती असल्याचे मत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील माजी सिनेट व व्यवस्थापन परिषद सदस्य तसेच कराड येथील क्रि ष्णा इन्स्टिट्युुट आॅफ मेडिकल सायन्सचे कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी व्यक्त केले.पिंपळगाव बसवंत येथील रेडियंट स्कूल शिक्षा महोस्तव प्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर भोसला मिलीटरी स्कुलचे सचिव दिलीप बेळगावकर, मविप्र संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार, गजलकार लक्ष्मीशंकर वाचपेयी, सुधाकर पाठक, शिखर श्रीवास्तव, रवी शुक्ला, संध्या श्रीवास्तव, मुख्याध्यापक कांता पाथरे, शिक्षणाधिकारी, एन. एस. पाटील आदी उपस्थित होते.लक्ष्मीशंकर वाचपेयी यांनीही मार्गदर्शन केले. मुलांना आपण चांगल्या शिक्षणासाठी चांगल्या शाळेत टाकतो फी भरतात तुमची जबाबदारी संपली असे नाही तेव्हा खऱ्या अर्थाने जबाबदारी वाढलेली असते असे निलीमा पवार यांनी पालक व विध्यार्थीना मार्गदर्शन करताना सांगितले. शाळेत जेव्हा कार्यक्र माला पालकांना उपस्थित असायला पिहले तेव्हा पालक उपस्थित नसतात. शाळेप्रमाणेच पालकांनी आपल्या पाल्यावर लक्ष देणे गरजेचे आहे. शाळेत मुलांना काय शिक्षण दिले, ते दररोज पालकांनी विचारायला पाहिजे पालक जे अशा गोष्टीत कमी पडत असेल तर शाळा काहीच करू शकत नाही. आपले मूल मोठे अधिकारी बनवायचे असेल, त्याचे भविष्य घडवायचे असेल तर ती काळजी घेणे गरजेचे आहे. पैशाचे काय महत्व आहे ते त्यांना सांगा, अडचणीचा पाढा त्यांच्या समोर ठेवा म्हणजे परिस्थितीची जाणीव त्यांना होईल असे त्या म्हणाल्या.यावेळी गणेश बनकर, संजय मोरे, बापू कडाळे, अश्विन पाटील, मोतीराम पवार, दीपक झगडे आदीसह पालक विद्यार्थी मोठया संख्येत उपस्थित होते.
देशाचे भविष्य तरु ण पिढीच्या हाती ...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2019 5:44 PM
आई व शिक्षकांच्या शिकवणीतून विद्यार्थी संस्काराच्या वाटेवरून प्रगतीच्या दिशेने भरारी घेत असल्याने पालकांनी आपल्या पाल्यास प्रोत्साहन देण्याची गरज असून शिक्षक विद्यार्थाचे सर्व काही असतात त्यामुळे शिक्षकांनी विध्यार्थीना योग्य शिक्षण देणे गरजेचे आहे. चांगले शिक्षण द्या मुले भविष्य घडवतात. भविष्य मंदिराच्या माध्यमातून नाही तर छोट्या छोट्या विद्यालयाच्या माध्यमातून घडत असून देशाचे भविष्य तरु ण पिढीच्या हाती असल्याचे मत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील माजी सिनेट व व्यवस्थापन परिषद सदस्य तसेच कराड येथील क्रि ष्णा इन्स्टिट्युुट आॅफ मेडिकल सायन्सचे कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी व्यक्त केले.
ठळक मुद्देवेदप्रकाश मिश्रा : पिंपळगाव बसवंत रेडियंट स्कूल शिक्षा महोस्तव