* पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू अर्थात चाचा नेहरू यांच्या जन्मदिनी साजºया होणाºया बालदिनाच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाने विविध शाळांतील निवडक विद्यार्थ्यांना ‘महाराष्टÑाचे भावी महापत्रकार’ म्हणून पत्रकारिता करण्याची व अनुभवण्याची संधी उपलब्ध करून दिली. नाशकातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी या प्रकल्पांतर्गत आपली मते स्पष्टपणे नोंदविलीच; शिवाय महापौर रंजना भानसी यांच्यावर नागरी समस्यांशी संबंधित प्रश्नांची सरबत्तीही केली. विद्यार्थीदशेतील ही मुले शहराच्या समस्यांप्रती किती जागरूक आहेत व त्यांना कसे समाजभान आले आहे, याचा प्रत्ययच या प्रकल्पातून व महापौर मुलाखत सत्रातून आला. यांनी घेतला सहभाग... * नेहा कोठावदे (सारडा कन्या विद्यालय, शालिमार), श्वेता मोघे (आदर्श माध्यमिक विद्यालय, सीबीएस), निशा भदाणे, अमिषा डावरे (रचना विद्यालय, शरणपूररोड), पूर्वा चौधरी (सरस्वती विद्यालय, डीजीपीनगर), गायत्री वाणी (डे केअर सेंटर स्कूल, सिडको), श्रुती पाटील (न्यू इरा स्कूल, गोविंदनगर), आयुष कटारिया, अर्जित कोरडे (अशोका ग्लोबल अकॅडमी, चांदसी), प्रतीक्षा काकड (छत्रपती शिवाजी विद्यालय, मखमलाबाद), मुग्धा थोरात (न्यू मराठा स्कूल, गंगापूररोड), मंजिरी पाटील, मृणालिनी देशमुख (मराठा हायस्कूल, गंगापूररोड), हेत्वी रूपारेल (एस्पॅलियर एक्स्प्रीमेंट स्कूल), वैदेही शिरास (सीडीओ मेरी हायस्कूल), सानिया अन्सारी (गुरू गोविंदसिंग पब्लिक स्कूल, इंदिरानगर).
महाराष्टचे भावी महापत्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 1:26 AM