पुण्याच्या वैशाली प्रकाशनाने हे काव्य संग्रह प्रकाशित केले आहेत. भुजबळ फॉर्म येथे झालेल्या या सोहळ्यास माजी खासदार समीर भुजबळ उपस्थित होते. ग्रामीण भागातील चाली-रिती, रुढी-परंपरा, सण-वार, देव-दैवते, कोरोना रुपाने वैश्विक मानव जातीसाठी निसर्गाने उभे केलेले आव्हान, पोलीस, आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, परिचारिका, जंगल निसर्ग, आई-वडील, बहीण - भाऊ, कष्टकरी शेतकरी यांच्या व्यथा, राजकीय पटलावर कार्यरत विकास पुरुष, बालपणीचे मित्र, शिक्षक, विविध सहकारी पतसंस्था, बँका, जिल्हा परिषद, ग्रामीण मराठी शाळा, नशा बंदी आदी विषयांवर वास्तव लिखाण यात नमूद आहे. विविध विषय काव्य स्वरुपात सादर करून ग्रामीण जीवनाचे हुबेहूब वर्णन काव्य स्वरुपात मांडण्यात आले असून, शेतकऱ्याच्या ग्रामीण जीवनाचा उहापोह करण्याचा प्रयत्न उभय काव्य संग्रहातून केला आहे. या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी कवी जी. पी. खैरनार, वैशाली प्रकाशनचे विलास पोद्दार, सुनीता खैरनार आदी उपस्थित होते.
जी. पी. खैरनार यांच्या दोन काव्यसंग्रहांचे प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 4:13 AM