प्रभाग क्रमांक ४ मध्ये पाहणी करताना मनपा आयुक्त अभिषेक कृष्ण.पंचवटी : मनपा प्रभाग क्रमांक चारमध्ये मनपा आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी पाहणी दौरा करून प्रभागातील समस्या जाणून घेत त्या तत्काळ सोडविण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याबाबत संबंधित अधिकाºयांना आदेश दिले. त्याचप्रमाणे वाघाडी नदीच्या पुराची समस्या सोडविण्यासाठी गॅबियल वॉल उभारणीसाठी अहवाल तयार करण्याचे आदेश दिले.फुलेनगरमधील तीन पुतळा येथून पाहणी दौºयाला सुरुवात करण्यात आली. प्रभागाचे नगरसेवक जगदीश पाटील यांनी प्रभागातील परिसराची माहिती दिली. आयुक्तांनी तीन पुतळा येथे सुरू असलेल्या सामाजिक सभागृहाच्या बांधकामाची पाहणी केली. त्यानंतर भराडवस्ती, गौंडवस्तीचा दौरा करून मनपा शौचालयांची पाहणी, तारवालानगर उद्यान विकसित करणे, रस्त्यांचे रुंदीकरण अर्धवट पुलाचे बांधकाम पूर्ण करणे, आदी कामांची पाहणी करून ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे कृष्ण यांनी सांगितले. वाघाडी, बुरूडडोह येथे नागरिकांनी पावसाळ्यात नदीला पूर आल्यानंतर पाणी घरात येत असल्याचे सांगितले. त्यावर आयुक्तांनी गॅबियल वॉल उभारणी करण्यासाठी आराखडा तयार करण्याचे आदेश दिले. वाघाडीत असलेले मनपा रुग्णालय अद्ययावत बनविण्याची मागणी सरिता सोनवणे, जगदीश पाटील यांनी केली. मायको रुग्णालयात डॉक्टर व कर्मचारी नियमित नसल्याची तक्र ार शांता हिरे यांनी केली होती. आयुक्तांनी रुग्णालयाला भेट दिली असता वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी जागेवर नसल्याचे दिसून आले. रुग्णालयात प्रसूतिगृहाची सोय करण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी केली. या दौºयाप्रसंगी प्रभाग सभापती प्रियंका माने, माजी नगरसेवक रूपाली गावंड, शंकर हिरे, किरण सोनवणे, विभागीय अधिकारी राजेंद्र गोसावी, सी. बी. अहेर, संजय गोसावी, राहुल खांदवे, पी. एम. निकम आदींसह मनपा अधिकारी उपस्थित होते.
वाघाडी परिसरात गॅबियल वॉल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2017 1:20 AM