येवला : येथील रेल्वेस्थानक परिसरात लूप लाइनवर उभ्या असलेल्या मालगाडीच्या डब्यातून साखरेच्या गोण्या चोरणाºया दोन चोरट्यांना रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून साखरेच्या ४६ गोण्या व एक मोटारसायकल ताब्यात घेण्यात आली आहे.साईनगर शिर्डीचे निरीक्षक आर.एल. मीना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गुरु वारी पथकासह येवला रेल्वे स्टेशन येथे दाखल झाले. त्यावेळी भीमा संपतराव अकात (३४), रा. येवला व राम सुरेश भड (२३), रा. धामोडा, ता. येवला या दोघांनी उभ्या असलेल्या मालगाडीच्या डब्याचे नट-बोल्ट तोडून ५० किलो वजनाच्या साखरेच्या ४६ गोण्या चोरीच्या उद्देशाने बाहेर काढल्या होत्या. त्या दोघांची चौकशी केली असता त्यांचे इतर साथीदार जीवन गायकवाड व राहुल हरी सोनवणे ऊर्फ पप्पू (दोघे, रा. येवला रेल्वेस्टेशन) हे काही माल रिक्षातून घेऊन पसार झाले.सदरची कारवाई निरीक्षक आर.एल. मीना, उपनिरीक्षक एम.के. दहिया, सहउपनिरीक्षक पी.एन. सातपुते, कॉन्स्टेबल डी.बी. वीरकर, नीलेश पाटील यांनी केली.मोटारसायकलही जप्तताब्यात घेतलेल्या दोघांजवळून ५० किलो वजनाच्या साखरेच्या ४६ गोण्या व एक मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. ताब्यात घेतलेल्या दोघांवर रेल्वे पोलीस साईनगर स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांना अटक करण्यात आली आहे. इतर दोघांचा रेल्वे पोलीस शोध घेत आहेत.
रेल्वेतून साखरेच्या गोण्या चोरणारे गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 1:47 AM
येवला येथील रेल्वेस्थानक परिसरात लूप लाइनवर उभ्या असलेल्या मालगाडीच्या डब्यातून साखरेच्या गोण्या चोरणाºया दोन चोरट्यांना रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून साखरेच्या ४६ गोण्या व एक मोटारसायकल ताब्यात घेण्यात आली आहे.
ठळक मुद्देदोघे फरार : शिर्डी रेल्वे पोलिसांची कारवाई