इंदिरानगर परिसरातून दोन महिन्यांपूर्वी एक युवती बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या आई-वडिलांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात दिली होती. तेव्हापासून पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली या बेपत्ता मुलीचा शोध घेतला जात होता. युवतीचा शेअर चॅट ॲप्लिकेशनद्वारे एका व्यक्तीशी संपर्क झाल्याचे तपासात पुढे आले. संशयित वैभव लक्ष्मण पाटील (रा.मुरळी, ता.पाटण, जि.सातारा) याच्यासोबत घरातून डिसेंबर महिन्यात गेल्याची माहिती समजली. सातत्याने पाटील याच्या मागावर इंदिरानगरमधील पोलिसांचे पथक होते; मात्र कोठूनही त्याचा सुगावा लागू शकत नव्हता. मुरबाड, ठाणे, सातारा, महाड या शहरांमध्ये पोलीस त्याचा शोध घेत होते. मुरबाडमधील एका खबऱ्याकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या अधारे पथकाने तेथे सापळा रचला. उपनिरीक्षक प्रवीण बाकले, सुहासिनी बारेला, जावेद खान आदींनी संशयित पाटील यास शिताफीने अटक केली. तसेच त्याच्या तावडीतून बेपत्ता मुलीची सुखरूप सुटकाही केली. त्याच्याविरुध्द यापूर्वी ठाणे जिल्ह्यातील रबाडा पोलीस ठाण्यासह साताऱ्यात बलात्काराचे गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, पाटीलविरुध्द इंदिरानगर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने येत्या शनिवारपर्यंत (दि.२०) पोलीस कोठडी सुनावली. पुढील तपास बारेला या करीत आहेत.
-----इन्फो----
...असा केला विश्वास संपादन
पीडित मुलीशी चॅटिंग करत तिचा मोबाइल क्रमांक मिळवून तिच्याशी मैत्री करत नंतर प्रेमसंबंध असल्याचे सांगून आपण कोर्टात जाऊन लग्न करू. युवतीला पाथर्डीफाटा येथून झायलो कारमध्ये (एमएच१४ सीएक्स २५९५) या वाहनात बवसून तिचा मोबाइल ताब्यात घेत तो बंद करत बळजबरीने थेट मुरबाडला घेऊन गेला. विवाहाच्या नावाखाली त्याने पीडितेकडील दीड तोळ्याचे दागिने काढून घेत बनावट नोटरी केल्याची कागदपत्रे दाखवून फसवणूक, तर तिच्या इच्छेविरुध्द सलग काही दिवस शारीरिक संबंध प्रस्थापित करत लैंगिक अत्याचार केल्याचे तपासात पुढे आले आहे.
---
फोटो आर वर १७इंदिरानगर नावाने सेव्ह