पेठ - शाळेच्या दारापाशी रांगोळी, फुग्यांनी सजवलेले वर्ग आणी नव्याने दाखल होणार्या बालकांच्या स्वागताची व आगमनाची केलेली जोरदार तयारी यामुळे शाळेचा पिहला दिवस चांगलाच उत्साहात साजरा करण्यात आला. पेठ तालुक्यात प्राथमिक, माध्यमिक, शासकिय व इतर माध्यमाच्या जवळपास २५० शाळा आहेत. शाळा सुरू होण्यापूर्वी शाळा प्रवेशोत्सव बाबत मोठया प्रमाणावर जनजागृती झाल्याने शिक्षकांनी जय्यत तयारी केली होती. गावागावात मुलांचे सजवलेल्या बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. तर ग्रामीण व दुर्गम गावांमध्ये पालकांनी चक्क आपल्या पाल्यांना पाठीवर व खांद्यावर बसून शाळेत दाखल केले. समग्र शिक्षा अभियान मार्फत पिहल्याच दिवशी पुस्तकांचे वाटप करण्यात आले.तर विविध सामाजिक संस्थेच्या माध्यमातून दप्तर, वहया व शैक्षणकि साहित्य वाटप करण्यात आले. गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे, गटशिक्षणाधिकारी संतोष झोले यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी शाळांना भेटी देऊन उपक्र मात सहभाग नोंदवला.
शाळा प्रवेशोत्सवाने गजबजली ज्ञानमंदिरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 2:14 PM