पंचवटी : गंगाघाटावरील गजानन महाराज पालखीची मिरवणूक काढण्यात आली. मंदिर श्री कपिकूल सिद्धपीठम येथे सदगुरू १००८ श्री महंत तपोमूर्ती वेणाभारती महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. सदगुरू वेणाभारती महाराजांनी घरोघरी, गावोगावी, पायी अनवाणी फिरून सनातन भिक्षा परंपरा चालू ठेवली आहे. संपूर्ण विश्वामध्ये शांती प्रस्थापित करणारी ही भिक्षापरंपरा आहे. या संन्यस्त झोळीतील भिक्षेचा लाभ केवळ वेणाभारती महाराजांमुळेच भारतात तसेच परदेशातही होतो आहे. ही भिक्षा वर्षभर घरात ठेवल्याने सर्वांना आरोग्यपूर्ण, शांतीपूर्ण, सौख्यपूर्ण आयुष्य लाभते असे मानले जात असल्याने भिक्षा ही सर्व जिवांसाठी चिंतामणीच आहे. गेल्या १८ वर्षांपासून असंख्य भरघोस धान्य गुरू हजारो भक्तांना वाटप करीत आहेत. शुक्रवारी झालेल्या या कार्यक्रमात संपूर्ण देशभरातील भक्तांनी भिक्षा धान्य घ्यायला मंदिरात मोठी गर्दी केली होती. सकाळी ११ ते रात्री ११ यावेळेत गुरुंच्या हस्ते अखंड धान्य वाटप कार्यक्र म सुरू होता.
गंगाघाटावरील गोदाघाटावर गजानन महाराज पालखी मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 12:36 AM
पंचवटी : गंगाघाटावरील गजानन महाराज पालखीची मिरवणूक काढण्यात आली. मंदिर श्री कपिकूल सिद्धपीठम येथे सदगुरू १००८ श्री महंत तपोमूर्ती वेणाभारती महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
ठळक मुद्देशांती प्रस्थापित करणारी ही भिक्षापरंपरा धान्य हजारो भक्तांना वाटप