पंचवटी: श्री गजानन महाराज सेवा संस्था नाशिक यांच्या वतीने रविवारी पुरुषोत्तममास (अधिकमास) निमित्ताने संत गजानन महाराज शेगाव यांच्या रजत मुखवट्याचे विधिवत पूजन करून मंत्रोच्चारात रामकुंडावर शाहीस्नान घालण्यात आले. त्यानंतर काळाराम मंदिर येथे श्रीराम भेट सोहळा पार पडला.रविवारी सकाळी १० वाजता लोणार गल्ली (रविवार पेठ) येथून ‘श्रीं’ची सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक रविवार कारंजा, गाडगे महाराज पुतळा, मेनरोड, तिवंधा, भद्रकाली, सोमवार पेठ, दिल्ली दरवाजा आदी भागातून काढण्यात येऊन रामकुंड येथे समारोप करण्यात आला. रामकुंड येथे दूध, दही, तसेच विविध फळांच्या रसांनी रजत मुखवट्यास अभिषेक करण्यात येऊन शाहीस्नान घालण्यात आले. त्यानंतर मुखवटा राम मंदिरात नेऊन श्रीराम भेटीचा कार्यक्रम संपन्न झाला.भाविकांना दर्शन घेता यावे यासाठी मंदिर परिसरात मुखवटा ठेवण्यात आला होता. सायंकाळी ७ वाजता मान्यवरांच्या हस्ते मुखवटा आरती करण्यात आली. यावेळी झालेल्या शाहीस्नान व श्रीराम भेट सोहळ्याला अध्यक्ष रामदास बोंदार्डे, उपाध्यक्ष सुजाता करजगीकर, रवींद्र जोशी, सुधीर शिंपी, शरद जोशी, संदीप इंदोरकर, हेमंत भालेराव आदींसह भाविक उपस्थित होते.
गजानन महाराज मुखवट्याची मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2018 12:53 AM
पंचवटी: श्री गजानन महाराज सेवा संस्था नाशिक यांच्या वतीने रविवारी पुरुषोत्तममास (अधिकमास) निमित्ताने संत गजानन महाराज शेगाव यांच्या रजत मुखवट्याचे विधिवत पूजन करून मंत्रोच्चारात रामकुंडावर शाहीस्नान घालण्यात आले. त्यानंतर काळाराम मंदिर येथे श्रीराम भेट सोहळा पार पडला.
ठळक मुद्देपंचवटी : पुरुषोत्तम मासानिमित्त शाहीस्नान