नाशिक : अयोध्येत प्रभू श्री राममंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाभर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. विविध सामाजिक, धार्मिक व राजकीय संघटनांनी पूजा, महाआरती करत महाप्रसादाचे वाटप केले तसेच फटाक्यांची आतषबाजी करत घरावर गुढी उभारत जल्लोष साजरा केला.बगडू येथे श्रीराम, हनुमानाच्या प्रतिमेचे पूजनकळवण : तालुक्यातील बगडू येथील गुरुदत्त मंदिरातील प्रांगणात श्री हनुमान, श्रीराम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन सामूहिक दीपप्रज्वलन करण्यात आले.बगडू गावातील भाजपचे तालुकाध्यक्ष दीपक खैरनार यांच्या हस्ते प्रतिमापूजन व श्रीरामांची आरती करण्यात आली. यावेळी भाजप तालुका महामंत्री डॉ. अनिल महाजन, तालुका सरचिटणीस विश्वास पाटील, यतिन पवार, काशीनाथ गुंजाळ, मोतीराम वाघ, अशोक चव्हाण, गोरख पवार, नितीन सूर्यवंशी, अनिल वाघ, साहेबराव वाघ, पोपट आहेर, बगडू गावातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.साल्हेर, मांगीतुंगीच्या कार्यक्र माला पोलिसांचा मज्जावसटाणा : राममंदिराच्या पायाभरणी सोहळ्याच्या पार्र्श्वभूमीवर सटाणा शहरासह बागलाण तालुक्यात खासदार डॉ. सुभाष भामरे, आमदार दिलीप बोरसे यांनी कार्यक्रम आयोजित केले होते. मात्र हे कार्यक्रम पोलीस प्रशासनाने हाणून पाडले. पोलिसांनी मज्जाव केल्याने सर्व कार्यक्र म रद्द केले असले तरी आमदार बोरसे यांनी जायखेड्यात भजनी मंडळात सहभागी होऊन रामाचा जप केला. राममंदिर पायाभरणी या ऐतिहासिक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर बोरसे यांनी रामाचे वास्तव्य असलेल्या मांगीतुंगी आणि छत्रपती शिवरायांचे वास्तव असलेल्या साल्हेर किल्ल्याच्या पायथ्याशी कार्यकर्त्यांसह रामाचा जप करून आनंदोत्सव साजरा करून शबरीधाम येथे शबरी मातेच्या मंदिरात कार्यक्रम आयोजित केले होते. मात्र पोलीस प्रशासनाने बोरसे यांना कार्यक्रम घेण्यास मज्जाव केला. जायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे व पोलीस कर्मचाऱ्यांनी आमदार बोरसे यांच्या निवासस्थानाला वेढा मारून त्यांना बाहेर निघण्यास मज्जाव केला. दरम्यान, बोरसे यांनी पोलिसांना गुंगारा देत जायखेडा येथील प्रसिद्ध ह.भ.प. कृष्णाजी गुरु माउली यांच्या समाधिस्थळी भजनी मंडळात सहभागी होऊन रामाचा जप केला. दरम्यान, खासदार डॉ. भामरे यांनी त्यांचे संपर्क कार्यालय तसेच विविध कामांच्या उद्घाटनाचे आयोजन केले होते. मात्र पोलीस प्रशासनाने कार्यक्रम घेण्यास मज्जाव केल्याने कार्यक्र म रद्द करावे लागले.
गजर रामनामाचा अन् जल्लोष स्वप्नपूर्तीचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2020 10:20 PM
अयोध्येत प्रभू श्री राममंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाभर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. विविध सामाजिक, धार्मिक व राजकीय संघटनांनी पूजा, महाआरती करत महाप्रसादाचे वाटप केले तसेच फटाक्यांची आतषबाजी करत घरावर गुढी उभारत जल्लोष साजरा केला.
ठळक मुद्देआनंदोत्सव : प्रभू श्रीरामांच्या मंदिर भूमिपूजन सोहळ्यानिमित्त जिल्हाभर विविध धार्मिक कार्यक्रम; महाप्रसादाचे वाटप