कळवण : मानुर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी गजेंद्र पंढरीनाथ पवार यांची बिनविरोध निवड झाली. यामुळे बिनविरोध उपसरपंच निवडीची परंपरा कायम राहीली.आवर्तन पध्दतीनुसार उपसरपंच यशोदाबाई पवार यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी सरपंच योगेश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली व ग्रामविकास अधिकारी एस. टी. पाटील यांच्या उपस्थितीत विशेष सभा घेण्यात आली. यावेळी उपसरपंचपदासाठी गजेंद्र पवार, अनिल गांगुर्डे यांचे दोन अर्ज आले. तर अनिल गांगुर्डे यांच्या अर्जावर सूचक म्हणून सही नसल्याने छाननीमध्ये त्यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला. यानंतर गजेंद्र पवार यांचा एकमेव अर्ज वैध ठरल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी गजेंद्र पवार यांची अविरोध निवड झाल्याची घोषणा केली. यानिमित्ताने मानुर ग्रामपंचायतीत माजी सभापती अॅड. संजय पवार, कृउबा सभापती हेमंत बोरसे, संभाजी पवार, रवींद्र बोरसे, अभिजीत पवार यांचे वर्चस्व कायम आहे. यावेळी सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने नवनिर्वाचित उपसरपंचांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी यशोदा पवार, सोनाली बोरसे, लतिका पवार, रमेश पिठे, योगेश बागुल, गोपाळ पिठे, रंजना कुवर, वैशाली चव्हाण, वंदना पिठे आदिंसह बाळू पवार, परशुराम पवार, विलास बोरसे, दिलीप पवार, रवींद्र पवार, सुरेश कुवर आदी उपस्थित होते.
मानुर ग्रामपंचायत उपसरपंचपदी गजेंद्र पवार बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 6:02 PM
कळवण : मानुर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी गजेंद्र पंढरीनाथ पवार यांची बिनविरोध निवड झाली. यामुळे बिनविरोध उपसरपंच निवडीची परंपरा कायम राहीली.
ठळक मुद्देगजेंद्र पवार यांचा एकमेव अर्ज वैध