पक्ष्यांची शिकार करणे तसे कायद्याने गुन्हा आहे. भारतीय वन्यजीव कायद्याच्या संरक्षण अनुसूची-१ किंवा अन्य अनुसूचीमधील पक्ष्यांची शिकार झाल्यास कारावासही भोगावा लागू शकतो. शाळकरी मुलांच्या हातून पुन्हा गलोल घालविण्यासाठी नाशिक पूर्व, पश्चिम वनविभागाला वन्यजीवप्रेमी, निसर्गप्रेमी संस्थांच्या मदतीने जनजागृतीपर मोहीम राबवावी लागणार आहे. कारण, पंचवटीमधील फुलेनगर झोपडपट्टीपासून मेरी, म्हसरुळ, मखमलाबाद, हनुमानवाडी, मोरे मळा, हिरावाडी, निलगिरीबाग, तपोवन, रामटेकडी या भागात सर्रासपणे शाळकरी वयातील मुले हातात गलोली आणि पक्ष्यांना अडकविण्यासाठीचे सापळे घेऊन फिरत असल्याचीही चर्चा आहे. मेरी-म्हसरुळ भागात सर्रासपणे गलोलींचा वापर झोपडपट्टीत राहणाऱ्या लहानग्यांसह तरुणांकडूनही केला जात असल्याचे बाेलले जात आहे. यामुळे येथील जलसंपदा विभागाच्या लहान जंगलात असलेल्या राष्ट्रीय पक्षी मोराचा अधिवासही धोक्यात सापडला आहे.
निसर्गात मुक्त असलेले पक्षीजीवन अधिकाधिक समृद्ध व्हावे, याकरिता दरवर्षी राष्ट्रीय पक्षी दिन साजरा केला जातो. नुकतेच यावर्षी नोव्हेंबर महिन्यात राज्य सरकारकडून पक्षी सप्ताहदेखील साजरा केला गेला. याअंतर्गत पक्ष्यांचे निसर्गामधील महत्त्व आणि जैवविविधतेमधील स्थान याबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न झा. मात्र, गाव, आदिवासी पाडे, खेड्यांवर तसेच शहराजवळच्या खेड्यांमध्येसुद्धा मूळ प्रवाहापासून दूर असलेल्या घटकांपर्यंत जनजागृती करण्याची गरज आहे. जेणेकरून गलोलींद्वारे पक्ष्यांची होणारी छुपी शिकार थांबेल, असे पक्षीप्रेमींचे म्हणणे आहे.
---इन्फो--
...रात्री चाले पक्षी शिकारीचा ‘खेळ’
त्र्यंबकेश्वर भागातील राखीव वनांसह वैतरणा, वाघाड, गंगापूर, काश्यपी, गौतमी यांसारख्या महत्त्वाच्या पाणथळ जागांच्या परिसरात चक्क रात्रीच्या अंधारातसुद्धा काही तरुणांकडून पक्ष्यांच्या शिकारीचा ‘खेळ’ खेळला जात असल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. एलईडी बॅटऱ्यांच्या अधारे पक्ष्यांचा शोध घेत त्यांची शिकार केली जात आहे. हे शिकारी सराईत असून, त्यांच्याकडून जंगलातसुद्धा घुसखोरी केली जात आहे.
--इन्फो---
या पक्ष्यांवर शिकाऱ्यांचा ‘डोळा’
सूर्यपक्षी, शिंजीर, चष्मेवाला यांसारख्या लहान पक्ष्यांसह सुतारपक्षी, धनेश, शराटी, घुबड, पाकोळी, पाणभिंगरी, चिमणी, मैना, भोरड्या मैना, साळुंखी, घार यांसारख्या पक्ष्यांची सर्रास शिकार केली जात आहे. असुरक्षित पाणथळांवर हिवाळ्यात स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन होत असताना काही शिकारी त्यांच्यावर वक्रदृष्टी करत असल्याचेही दिसून येत आहे.
---
फोटो आर वर १६बर्डस/बर्डस१/२/३ नावाने सेव्ह आहे.