शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

‘शक्यतांचा खेळ’

By admin | Published: September 12, 2014 12:06 AM

‘शक्यतांचा खेळ’

 केवळ क्रिकेटच्या खेळालाच नव्हे, तर राजकारणाच्या खेळालाही हल्ली ‘शक्यतांचा खेळ’ (गेम आॅफ पॉसिबिलिटीज) म्हणतात. त्यातही पुन्हा जेव्हां वातावरण निवडणूकमय झालेले असते, तेव्हां नानाविध शक्यता तर निर्माण होतातच, पण त्या गृहीत धरुन तसे आडाखे वा डावपेच रचले जातात. जेव्हां कोणत्याही एखाद्या पक्षाला स्पष्ट बहुमताचा आधार प्राप्त असतो, तेव्हां निर्माण होणाऱ्या शक्यता अत्यंत जुजबी स्वरुपाच्या असल्याने पक्षाने जे काही अगोदरच ठरविले आहे, त्यावर शिक्कामोर्तब करणे, इतकेच काय ते काम बाकीच्यांना करायचे असते. पण जेव्हां परिस्थिती अत्यंत गुंतागुंतीची असते, विविध पक्षांचा गलबला असतो, जो तो इतरांवर कुरघोेडी करायला टपलेला असतो. तेव्हां शक्यतादेखील भूमितीय पद्धतीने वाढलेल्या असतात. अशा स्थितीत मग सुस्पष्ट बहुमताचा वर कोणालाही प्राप्त नाही, पण ते वसूल करण्याची ईर्ष्या मात्र कोणीही त्यागायला तयार नाही, अशा टप्प्यातील नाशिक महानगरपालिकेत आज होणारी शहराच्या नव्या महापौराची निवडणूक अपवाद कशी असू शकेल?४लहान मुलांच्या गोष्टीतील जादूगाराचा प्राण जसा एखाद्या पोपटाच्या पोटातील अंगठीत असतो, त्याप्रमाणे राज ठाकरे यांचा राजकीय प्राण नाशिक महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत गुंतलेला असल्याचे बहुतेक साऱ्यांनी गृहीत धरले असल्याने, राज ठाकरे यांना अपशकून करण्यासाठी सारेच राजकीय पक्ष टपलेले आहेत. (यात काही मनसे सैनिकही आहेत?)४राजबाबूंनी नाशकात आपले राजकीय पाय घट्ट रोवले, ते प्रामुख्याने छगन भुजबळ यांना सतत तोफेच्या तोंडी देऊन. भुजबळांची अत्यंत प्रच्छन्न अवहेलना जितकी या ठाकरेंनी केली तितकी ती मोठ्या वा त्यांचे वारस ठरलेल्या छोट्या ठाकरेंनीही केली नाही. त्यामुळे राज-भुजबळ एकीकरण होणार नाही वा होऊ नये असे काहींना वाटते, पण राजकारणात तसे होईलच असे नाही कारण येथे काहीही होणे शक्य असते. ४नाशकातील भुजबळांच्या व्यक्तिगत राजकारणाला महत्व प्रदान करुन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार मनसेला दूर ढकलतील आणि भुजबळांची बूज राखतील किंवा त्यांनी ती राखावी, असे भले काहींना वाटो, पण तसे होईलच असेही नाही. ४भुजबळ नाशकात बसून महाराष्ट्र पाहू इच्छित असतील पण पवारांचे तसे नाही. त्यांना संपूर्ण राज्याच्या राजकारणाचा विचार करावयाचा असल्याने आजच्या घडीला त्यांना राज ठाकरे यांच्याप्रती उमाळा येणारच नाही, असे नाही. किंबहुना तो येईल याचीच शक्यता अधिक. कारण राज्याच्या ग्रामीण भागात जिथे राष्ट्रवादी पोहोचली आहे, तिथे शिवसेना अगोगरपासूनच हजर आहे. साहजिकच विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीची अधिकाधिक डोकी निवडून आणायची, तर सेना नामोहरम झाली पाहिजे आणि ते सत्कार्य राज ठाकरे यांच्याशिवाय कोण अधिक चांगले करु शकेल?४जे शरदरावांचे तेच नितीन गडकरींचे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या गादीवर भाजपाचा उमेदवार बसवायचा, तर सेनेच्या तुलनेत भाजपाची दोन-चार का होईना जास्तीची डोकी निवडून यावीच लागतील. त्यासाठी सेनेला शक्य होईल तिथे आणि तितके खिंडीत गाठावे लागेल. हे काम करायलाही पुन्हा तरबेज कोण, तर राज ठाकरे! ४महापौर होण्याची मनिषा अनेकांनी व्यक्त केली असली तरी शिवसेना याबाबतीत बरीच पावले पुढे चालून गेल्याचे चित्र आहे. अल्पाहून अल्प संख्याबळाच्या जोरावर सेना हे पद खेचून आणण्याच्या प्रयत्नात असल्याने साहजिकच सेनेला तिच्या इप्सितापासून मागे खेचणे हादेखील मग अन्य साऱ्या पक्षांचा एककलमी कार्यक्रम आहे. तो तडीस न्यायचा, तर असंगाशी संग करण्याची तयारी ठेवणे ओघानेच येते. त्यामुळे उभय काँग्रेस आणि मनसे यांच्या हातमिळवणीची शक्यता नाकारता येत नाही. तसे झाले तर अनायासे अति महत्वाकांक्षेने गांजलेल्या भाजपाचाही मुखभंग होऊ शकेल.