शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

गणपती बाप्पा मोरयाऽऽऽ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 12:23 AM

ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण अन गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष...अशा उल्हासपूर्ण वातावरणात सुखकर्ता-दु:खहर्ता विनायकाचे शहरात स्वागत करण्यात आले आणि अवघे वातावरण भक्तिमय झाले. केवळ सार्वजनिक मंडळेच नव्हे तर घरोघर गणराय विराजमान झाले असून, आता दहा दिवस केवळ बाप्पाचीच आराधना चालणार आहे.

ठळक मुद्देविघ्नहर्त्याचे जल्लोषात स्वागत हजारांहून अधिक मंडळांकडून प्रतिष्ठापना

नाशिक : ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण अन गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष...अशा उल्हासपूर्ण वातावरणात सुखकर्ता-दु:खहर्ता विनायकाचे शहरात स्वागत करण्यात आले आणि अवघे वातावरण भक्तिमय झाले. केवळ सार्वजनिक मंडळेच नव्हे तर घरोघर गणराय विराजमान झाले असून, आता दहा दिवस केवळ बाप्पाचीच आराधना चालणार आहे.दरवर्षीच ज्या आराध्य दैवताची प्रतीक्षा केली जाते अशा गणरायाच्या स्वागतासाठी तशी अगोदरच सज्जता झाली होती. काही सार्वजनिक मंडळांनी एक दिवस अगोदरच श्रींची वाजत-गाजत मिरवणूक काढली असली तरी बहुतांशी मंडळे आणि घरगुती उत्सवासाठी गुरुवारी म्हणजेच गणेश चतुर्थीचाच मुहूर्त साधला. शहराच्या विविध भागांत गणेशमूर्तीच्या विक्रीसाठी असलेल्या बाजारपेठांमध्ये आलेल्या विविध रूपातील गणेश रूपे बघून त्यातून प्रसन्न मूर्ती शोधण्यासाठी सकाळपासूनच गर्दी झाली होती. मूर्तीची अचूक निवड केल्यानंतर पूजा करून त्या मूर्तींना विधीवत घरी नेताना जागोजागी नागरिक सहकुटूंब सहपरिवार येत होतेच, परंतु मोठ्या मंडळाचा साज काही औरच होता. निवडलेल्या मूर्ती ढोल-ताशांच्या गजरात नेतानाच छोट्या मिरवणुकाही काढण्यात आल्या.काही मंडळांनी तर खास ढोल पथकेही आणून स्वागताच्या मिरवणुकीत साहसी खेळ तसेच लेजीम पथकाच्या कलाही सादर करण्यात आल्या. गणरायाच्या आगमनाबरोबरच विविध पूजा आणि प्राणप्रतिष्ठेसाठीदेखील सकाळपासूनच बाजारपेठेत धावपळ दिसली. रविवार कारंजा, भद्रकाली रोड आणि फूल बाजाराबरोबरच आकाशवाणी टॉवर, ठक्कर डोम, त्रिमूर्ती चौक अशा ठिकठिकाणी बाजार थाटले होते. गणेशाच्या प्रतिष्ठापनेसाठी लागणाऱ्या पत्री, फुले, हार त्याचबरोबर पूजाविधीचे अन्य साहित्य खरेदीसाठी झुंबड उडाली होती. फुले आणि अन्य साहित्याचे दर गर्दी बघून ठरले. साधारणत: चाळीस रुपये पाव किलो या दराने फुले तर तीस रुपयांपासून पुढील दराने हारांची विक्री करण्यात आली. घरोघरी पार्थिव गणेशात प्राणप्रतिष्ठा करून विधीवत श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली.नााशिक शहरात लहान-मोठी सुमारे सातशे मंडळांनी गणरायाची प्रतिष्ठापना केली. बहुतांशी मोठ्या मंडळांना यंदा उत्सव आणि मंडपाची परवानगी घेण्यात आलेल्या अडचणींमुळे वेळेत सजावट पूर्ण झालेली नसली तरी अनेक ठिकाणी पहिल्या दिवसापासूनच सजावटीची कामे पूर्णत्वास आलेल्या मंडळांनी आपले देखावे खुले केले. अर्थात, ८० टक्के देखाव्यांचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही.गणरायाच्या आगमनामुळे घराघरांत उत्साहाचे वातावरण असून, आता दहा दिवस श्री गणपती अथर्वशिर्ष पठणासह विविध कार्यक्रम होणार आहेत.घरोघरी शाडूमातीच्या मूर्तीप्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती आकर्षक फिनिशिंगच्या असल्या तरी गेल्या काही वर्षांप्रमाणे यंदाही शाडूमातीच्या मूर्तींनाच अधिक मागणी होती. त्यामुळे बहुतांशी ठिकाणी शाडूमातीच्या गणेशमूर्तीचे फलकदेखील लागले होते. घरगुती गणेशोत्सवासाठी नागरिकांनी शाडूमातीच्या मूर्तीलाच प्राधान्य दिले.रस्त्यांवरील स्टॉलच्या संख्येत घटमहापालिकेने रस्त्यावर मूर्ती विक्री करण्याऐवजी मैदानांच्या काही जागा निश्चित केल्या होत्या त्यात गोल्फ क्लब (ईदगाह) मैदानाचादेखील समावेश होता. परंतु विक्रेत्यांनी त्याऐवजी डोंगरे मैदान आणि ठक्कर डोम या खासगी जागेत मूर्ती विक्रीचे स्टॉल्स थाटले. महापालिकेचे स्टॉलच्या लिलावातून मिळणारे उत्पन्न बुडाले असले तरी रस्त्यावर विक्री थांबविण्याचा उद्देश मात्र बºयापैकी सफल झाला.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमGaneshotsavगणेशोत्सव