शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

१६-१७ फेब्रुवारीला ‘गंधर्व महोत्सव’

By admin | Published: January 28, 2015 11:07 PM

संस्कृती वैभवच्या वतीने आयोजन : स्थानिक कलावंतांसाठी नाट्यसंगीत व सुगमसंगीत गायनाची स्पर्धा

नाशिक : गेल्या काही वर्षांपासून नाशिकच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणाऱ्या संस्कृती वैभव संस्थेच्या वतीने येत्या १६ व १७ फेब्रुवारीला नाशिकमध्ये ‘गंधर्व महोत्सव-२०१५’ आयोजित करण्यात आल्याची माहिती संस्कृती वैभवच्या वतीने नंदन दीक्षित यांनी दिली.विशेष म्हणजे, या गंधर्व महोत्सवाच्या निमित्ताने नाशिकमधील संगीत क्षेत्रातील कलावंतांसाठी नाट्यसंगीत व सुगमसंगीत गायन स्पर्धेचे ८ फेब्रुवारीला आयोजन करण्यात आले आहे. गंधर्व महोत्सवाचे उद्घाटन १६ फेबु्रवारीला होणार आहे. त्यानंतर संगीत स्पर्धेची अंतिम फेरी व पारितोषण वितरण करण्यात येईल. गंधर्व महोत्सवाच्या निमित्ताने विशेष स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात येईल. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गायक आनंद भाटे, कौशल इनामदार, आदित्य ओक, चैतन्य कुंटे, राजीव परांजपे व सत्यशील देशपांडे आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच १७ फेब्रुवारीला संस्कृती वैभव पुरस्काराचे वितरण करण्यात येईल. त्याचवेळी पुरस्कारप्राप्त मान्यवरांचे संगीत/ वादन सादरीकरण करण्यात येईल. बालगंधर्व चित्रपट तयार करतानाचे अनुभव याविषयी चर्चासत्र आयोजित करण्यात आले असून, त्यात अभिनेता सुबोध भावे, गायक आनंद भाटे, कौशल इनामदार, आदित्य ओक, विभावरी देशपांडे, नितीन देसाई व रवि जाधव आदि सहभागी होतील. हे कार्यक्रम दादासाहेब गायकवाड सभागृहात होतील, तर ‘संस्कृती वैभव’च्या वतीने विद्यार्थ्यांसाठी आयोजित जिल्हास्तरीय नाट्यसंगीत व सुगमसंगीत गायन स्पर्धा ८ फेबु्रवारीला एस.एम.आर.के. महिला महाविद्यालयात होतील. त्यासाठी प्रवेश अर्ज करण्याची अंमित मुदत ३ व ४ फेबु्रवारीपर्यंत आहे. प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार विजेत्यांना अनुक्रमे पाच, तीन व दोन हजार रुपयांचे रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देण्यात येतील. तसेच स्पर्धेत सहभागी सर्व स्पर्धकांना सहभागाचे प्रमाणपत्र व पासेस विनामूल्य देण्यात येतील. स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. यावेळी पी.एस. कुलकर्णी, सुप्रिया देवघरे, किशोरी किणीकर, आशिष रानडे, अ‍ॅड. अजय निकम, महेश मिसाळ, डॉ.अरविंद पाठक आदि उपस्थित होते.(प्रतिनिधी)