नाशिक : बालगंधर्वांसारखाच स्वर... त्यांच्यावरील चित्रपटाच्या निर्मितीतील किस्से आणि हेलावून टाकणाऱ्या बालगंधर्वांच्या हृद्य आठवणी... अशी आगळी मैफल जमली अन् जणू पुन्हा एकदा बालगंधर्वांचा काळ नव्हे, तर खुद्द बालगंधर्व अवतरल्याचाच आभास नाशिककरांनी अनुभवला. ‘संस्कृती वैभव’च्या वतीने आयोजित गंधर्व महोत्सवातील आजची समारोपाची सायंकाळ रसिकांसाठी संस्मरणीय ठरली. कार्यक्रमात प्रारंभी ‘आनंद गंधर्व’ आनंद भाटे व संवादिनीवादक सुभाष दसककर यांना ‘संस्कृती वैभव’ पुरस्कार पं. सत्यशील देशपांडे व ‘मैत्रेय’च्या अध्यक्ष वर्षा सत्पाळकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. अकरा हजार रुपये, मानपत्र व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. सन्मानाला उत्तर देताना भाटे म्हणाले की, गंधर्व परंपरेशी नाळ जोडली गेली, हे आपले भाग्य आहे. बालगंधर्वांवरील चित्रपट ही त्यांचीच पुण्याई आहे. त्यांनी गुरू चंद्रशेखर देशपांडे, यशवंत मराठे, पं. भीमसेन जोशी यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
‘संस्कृती वैभव’च्या वतीने आयोजित गंधर्व महोत्सव
By admin | Published: February 18, 2015 1:38 AM