महानिर्मिती राज्य नाट्य स्पर्धा नाशिक : महाकवी कालिदास कलामंदिर येथे औष्णिक विद्युत केंद्रातर्फे सुरु असलेल्या महानिर्मिती कंपनीच्या आंतर विद्युत केंद्र नाट्य स्पर्धेत मंगळवारी (दि.२७)सकाळी गांधी विचारांवर आधारित ‘४७ एके ४७’ व दुपाच्या सत्रात ‘दि गेम आॅफ डेस्टीनी’नाटकांचे सादरीकरण झाले. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी प्रेक्षकांचा प्रतिसाद घटल्याचे दिसून आले असले तरी कलाकारांनी मात्र पूर्ण क्षमतेने सादरीकरण करीत परीक्षकांसह उपस्थितांची दाद मिळवली.महानिर्मिती कंपनीच्या आंतर विद्युत केंद्र नाट्य स्पर्धेत सकाळच्या सत्रात नागपूरच्या खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्राने संजय पवार लिखित ‘४७ एके ४७‘ नाटकाचे सादर केले. यातून गांधीवाद आणि हिंदुत्ववाद यातील वैचारिक मतभेदांवर प्रकाशझोत टाकताना गांधीवादी विचार शांती आणि अहिसंक मार्गानेही हिंसक प्रवृत्तींचा पडाव करू शकतात याचे सादरीकरण करण्यात आले. नाटकात दिग्दर्शक भास्कर शेगोकार यांनी प्रमूख भूमिका साकारली असून, त्यांच्यासह प्रसाद चौधरी, महेंद्र राऊत, प्राची दाणी, विकास अरसपुरे, अमर महल्के, संतोष पाटील, मानसिंग कोकणी यांनी कसदार अभिनय केला आहे. नेपथ्य विजय मोहाड, संगीत संकेत येळेगावकर, प्रकाशयोजना मारुती भोज व वेशभूषा भूषण दाणी यांनी केली आहे. दुपारच्या सत्रात पोफळी येथील कोयना जलविद्युत केंद्रातर्फे अमोल रेडीज लिखित ‘दि गेम आॅफ डेस्टिनी’ नाटकातून दिग्दर्शक मंगेश डोंगरे यांनी धनगर समाजाचे जीवनमान रंगमंचावर दाखवताना त्यांच्यातील माणुसकी या नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. एकाच वेळी २५ कलाकारांकडून सादरीकरणाचा मेळ बसवितांना दिग्दर्शकाला चांगलीच कसरत करावी लागली. या नाटकात विक्रांत जिरंगे, विश्वास कांबळे, प्रमोद बोडरे, सत्ताप्पा राणे, रामा भगत, संतोश डांगरे, दिलीप जाधव, मल्लेष कांबळे, उदय भोसले, मंगेश डोंगरे, पूजा गवळी, मोनिका जिरंगे, अनुजा मोट यांनी लक्षणीय अभिनय केला. मुख्य अभियंता आर. व्ही. तासकर यांची निर्मिती असलेल्या नाटकाचे नेपथ्य उदय भोसले व दिलीप जाधव, प्रकाषयोजना उदय पोटे व उमेष हिवरे, संगीत अजित मोटे व अभिजीत सांळुखे तसेच रंगभुषा व वेशभुषा मंगेश डोंगरे यांनी केली आहे.दुपारच्या सत्रात पोफळी येथील कोयना जलविद्युत केंद्रातर्फे अमोल रेडीज लिखित‘दि गेम आॅफ डेस्टिनी’ नाटकातून दिग्दर्शक मंगेश डोंगरे यांनी धनगर समाजाचे जीवनमान रंगमंचावर दाखवताना त्यांच्यातील माणुसकी या नाटकाच्या माध्यामातून प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
गांधी विचार आणि धनगर समाज जीवन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 12:55 AM