काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. मोसम पुलावर तालुका काँग्रेस अध्यक्ष डॉ. राजेंद्र ठाकरे, जिल्हा सरचिटणीस संजय पाटील व कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. त्यानंतर आंदोलकांतर्फे अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅसच्या दरात मोदी सरकार भरमसाठ वाढ करीत आहे. ट्रान्सपोर्ट व वाहतुकीच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक व शेतकरी हवालदिल झाला असून, आर्थिक नियोजन कोलमडले आहे. रासायनिक खतांचे दर वाढले आहेत. दरवाढ मागे घेऊन सर्वसामान्यांना आधार द्यावा. आंदोलनात डॉ. तुषार शेवाळे, जिल्हा उपाध्यक्ष नितीन बच्छाव, डॉ. अरुण पठाडे, सेवा दलाचे सतीश पगार, वाय. के. खैरनार, दत्तू वक्ते, राधेश्याम दरेकर, मेघश्याम भुसे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
फोटो मागवून घेणे.