नाशिक- शहरातील भालेकर मैदानावरील गणेशोत्सवाला परवानगी देण्यास लोकप्रतिनिधींचा आग्रह तर प्रशासनाचा विरोध असा पेच निर्माण झाला आहे. प्रशासनाने या ठिकाणी देखावे साकारण्यास नकार दिल्यानंतर स्थायी समितीत यासंदर्भात याच ठिकाणी उत्सवाला परवानगी द्यावी असा ठराव करण्यात आला आहे. स्मार्ट पार्कींग असलेल्या या मैदानावर खड्डे न खोदताच मंडप उभारण्याची हमी घ्यावी असे समिती सभापती उध्दव निमसे यांनी शुक्रवारी (दि. ९) स्थायी समितीच्या बैठकीत सांगितले तर आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी स्मार्ट पार्कींगच्या सेंसरला धोका पोहोचणार असेल तर परवानगी दिली जाणार नाही असे स्पष्ट केल्याने आठ मंडळाच्या बाबतीत प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.या जागेवर पुन्हा गणेशोत्सव साजरा करण्यास अडचण उदभवत आहे. याठिकाणी स्मार्ट पार्कींगचे काम पुर्ण झाल्याने आता याठिकाणी परवानगी देता येणार नाही असे पत्र पूर्व विभागाचे विभागीय अधिकारी नरसिंगे यांनी दिले आहे. यामुळे मंडळांनी स्थायी समितीकडे दाद मागितली. शुक्रवारी (दि.९) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत या संदर्भात अशासकिय ठराव करण्यात आला. परंतु त्याच बरोबर आयुक्तांनी पहाणी करून निर्णय द्यावा असे सभापती उध्दव निमसे यांनी सांगितले. विशेषत: खड्डे न करताही याठिकाणी मंडप उभारता येऊ शकतो असे निमसे यांचे म्हणणे आहे.दरम्यान, आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी मात्र याठिकाणी स्मार्ट पार्कींगचे काम झाले आहे. त्यामुळे रिमोट सेसिंगला धोका पोहोचत असेल तर परवानगी दिली जाणार नाही, असे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
नाशिक मध्ये भालेकर मैदानावर गणेशोत्सवावरून पेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2019 7:28 PM
नाशिक - शहरातील भालेकर मैदानावरील गणेशोत्सवाला परवानगी देण्यास लोकप्रतिनिधींचा आग्रह तर प्रशासनाचा विरोध असा पेच निर्माण झाला आहे. प्रशासनाने या ठिकाणी देखावे साकारण्यास नकार दिल्यानंतर स्थायी समितीत यासंदर्भात याच ठिकाणी उत्सवाला परवानगी द्यावी असा ठराव करण्यात आला आहे. स्मार्ट पार्कींग असलेल्या या मैदानावर खड्डे न खोदताच मंडप उभारण्याची हमी घ्यावी असे समिती सभापती उध्दव निमसे यांनी शुक्रवारी (दि. ९) स्थायी समितीच्या बैठकीत सांगितले तर आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी स्मार्ट पार्कींगच्या सेंसरला धोका पोहोचणार असेल तर परवानगी दिली जाणार नाही असे स्पष्ट केल्याने आठ मंडळाच्या बाबतीत प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
ठळक मुद्देस्थायी समिती म्हणजे त्याच ठिकाणी उत्सवप्रशासन म्हणते परिस्थिती बघून निर्णय