शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
2
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
3
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
4
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
5
RSA vs IND : दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला, टीम इंडिया सेट करणार टार्गेट!
6
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
7
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
8
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
9
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
10
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
12
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
13
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल
14
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
15
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया
16
'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले
17
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
18
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
19
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
20
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."

गणेशमूर्ती विक्रेत्यांना दुष्काळाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 3:53 PM

देवळा : चालू वर्षी दुष्काळी परिस्थिती, शेतीमालाचे कोसळलेले बाजारभाव, शेतकर्यांची नाराजी, गणेश मुर्तींच्या वाढलेल्या किंमतींचा फटका गणेशमूर्ती विक्र ेत्यांना बसला असून तोटा खाउन मुर्ती विकण्याची वेळ ह्या विक्रेत्यांवर आली. गतवर्षापेक्षा गणेशमूर्तींच्या विक्रि त 40 ते 50 टक्के घट झाली आहे. गणेश उत्सवावर दुष्काळाचे सावट दिसून येत आहे.

ठळक मुद्देगणेश उत्सवावर दुष्काळाचे सावट दिसून येत आहे.

देवळा : चालू वर्षी दुष्काळी परिस्थिती, शेतीमालाचे कोसळलेले बाजारभाव, शेतकर्यांची नाराजी, गणेश मुर्तींच्या वाढलेल्या किंमतींचा फटका गणेशमूर्ती विक्रेत्यांना बसला असून तोटा खाउन मुर्ती विकण्याची वेळ ह्या विक्र ेत्यांवर आली. गतवर्षापेक्षा गणेशमूर्तींच्या विक्रि त 40 ते 50 टक्के घट झाली आहे. गणेश उत्सवावर दुष्काळाचे सावट दिसून येत आहे.देवळा शहरात दरवर्षी दहा ते बारा व्यापारी गणेशमूर्ती विक्र ीचा व्यवसाय करतात. यासाठी ते रस्त्यालगत दर्शनी भागात आपली गणेशमूर्तीची दुकाने थाटतात. ह्या दुकानदारांची नियमति गिर्हाईके त्यांच्याकडून गणेशमूर्ती घेतात. यामुळे हया दुकानदारांना गणेशमूर्ती विक्रि साठी आणावयाच्या संख्येचा नेमका अंदाज असतो. त्या हिशोबाने ते दरवर्षी गणेशमूर्ती मागवतात. दुष्काळी परिस्थिती असेल तर गणेशमूर्तींच्या विक्रि त वाढ होते असा त्यांचा नेहमीचा अनुभव असल्यामुळे चालू वर्षातील कमी पर्जन्यमान पाहता गणेशमूर्तींच्या विक्रि त वाढ होईल ह्या अपेक्षेने त्यांनी मोठ्या प्रमाणात गणेशमूर्ती मागवल्या. परंतु त्यांचा अंदाज चुकला, गणेश मुर्तींची समाधानकारक विक्रि झाली नाही. तीन चार दिवस आधी मुर्तीची बुकिंग करणारे नियमति गिर्हाईकांनी मुर्तीचे आगाउ बुकिंग केले नाही. गणेश चतुर्थीच्या दिवशी सायंकाळी चार वाजेपर्यंत फारसे गिर्हाईक फिरकले नाही. त्यानंतर दुकानांमध्ये गर्दी झाली. एवढया मोठ्या प्रमाणात आणलेल्या मुर्ती विक्र ीसाठी मिळालेला कमी कालाविध व गिर्हाईकांचा अभाव यामुळे सायंकाळी मोठ्या प्रमाणात मुर्ती शिल्लक राहील्या. ह्या गणेशमूर्ती विक्रि केल्या नाहीत तर वर्षभर सांभाळाव्या लागणार होत्या. त्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या असत्या. अखेर नाईलाजास्तव हया विक्र ेत्यांना तोटा सहन करत मिळेल त्या दरात गणेशमूर्तीची विक्रि करावी लागली. गिर्हाईकांना मात्र स्वस्तात गणेशमूर्ती मिळाल्यामुळे ते मात्र खुषीत होते.बेरोजगारीची समस्या ग्रामीण भागात सातत्याने वाढत आहे. तालुक्यातील अनेक बेरोजगार युवकांनी कमाई मिळण्याच्या अपेक्षेने भांडवलाची गुंतवणुक करीत बसस्थानक, पाच कंदील परीसरात गणेशमूर्ती विक्रि चे नवीन स्टॉल हया वर्षी सुरू केले. ह्या स्टॉल्सची संख्या 40 पर्यंत पोहोचली. दरवर्षी दहा ते बारा स्टॉल लागत होते तेथे गणेशमूर्ती विक्रि चे चाळीस स्टॉल सुरू झाल्यामुळे त्याचाही विक्र ीवर परीणाम झाला.मागणीपेक्षा पुरवठा अधिक असा प्रकार झाल्यामुळे सर्वच विक्र ेत्यांना त्याचा फटका बसून तोटा सहन करावा लागला.