शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

गणेश मंडळांना मंडप उभारणीस अखेर अनुमती

By श्याम बागुल | Published: September 09, 2018 4:50 PM

शनिवारी सायंकाळनंतर महापालिका व गणेश मंडळांमध्ये वादाची ठिणगी पडली. घनकर गल्लीतील नवप्रकाश सूर्यप्रकाश मित्रमंडळाचे कार्यकर्ते ‘नाशिकचा राजा’साठी मंडपाची उभारणी करीत असताना महापालिकेच्या पश्चिम विभागीय अधिकारी नितीन नेरे यांनी तेथे येऊन रस्त्यावर मंडप उभारणीस मज्जाव केला

ठळक मुद्देरास्ता रोको मागे : आडकाठी करण्यास मनपास मज्जाव गणेशोत्सवावरील विघ्न टळल्याने भक्तांनी ढोलताशांच्या गजरात जल्लोष साजरा

नाशिक : गणेशोत्सव तोंडावर आलेला असताना नाशिक महापालिकेकडून मंडळांना मंडप उभारणीच्या परवानगीसाठी आडकाठी केली जात असल्याने संतप्त झालेले गणेशभक्त रविवारी सकाळी रास्ता रोको करण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी केलेल्या यशस्वी मध्यस्थीनंतर महापालिका नरमली. शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा विचार करता सर्व गणेश मंडळांना जागेवरच अनुमती देण्याची तयारी अधिकाऱ्यांनी दर्शविल्याने वादावर पडदा पडला असून, गणेशोत्सवावरील विघ्न टळल्याने भक्तांनी ढोलताशांच्या गजरात जल्लोष साजरा केला.शनिवारी सायंकाळनंतर महापालिका व गणेश मंडळांमध्ये वादाची ठिणगी पडली. घनकर गल्लीतील नवप्रकाश सूर्यप्रकाश मित्रमंडळाचे कार्यकर्ते ‘नाशिकचा राजा’साठी मंडपाची उभारणी करीत असताना महापालिकेच्या पश्चिम विभागीय अधिकारी नितीन नेरे यांनी तेथे येऊन रस्त्यावर मंडप उभारणीस मज्जाव केला. त्यावर मंडळाचे अध्यक्ष तथा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष समीर शेटे यांनी त्यांना जाब विचारला असता, प्रकरण तू-तू मै-मै पर्यंत गेले. नेरे यांनी गणपती बसवू देणार नाही, अशी भूमिका घेत, जुन्या नाशकातील सुमारे दहा ते बारा गणेश मंडळांचे मंडपाचे अतिक्रमण हटविण्याची तयारी सुरू केली. त्यावर मंडळाचे कार्यकर्ते व महापालिकेच्या अधिकाºयांमध्ये वाद झडला. सदरचे प्रकरण सरकारवाडा पोलीस ठाण्यात पोहचले. नितीन नेरे यांनी समीर शेटे यांच्यावर कारवाई करण्याचे पत्र पोलिसांना दिले, तर शेटे यांनीही नेरे यांनी धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार नोंदविण्याचा प्रयत्न केला असता त्यावर पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी समझोता घडवून आणण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत नाशकातील गणेश मंडळांपर्यंत हे वृत्त वाºयासारखे पसरताच रविवारी सकाळी १० वाजता महापालिका प्रशासनाच्या विरोधात रास्ता रोको करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.रविवारी सकाळी ९ वाजेपासूनच शहरातील गणेशभक्तांची घनकर लेनमध्ये जमवाजमव सुरू झाली. उत्सवाच्या तोंडावर शहरातील वातावरण खराब होऊ नये म्हणून पोलिसांनी पुन्हा मध्यस्थी केली व गणेश मंडळांना रस्त्यावर मंडप उभारणीस अनुमती देण्याची तयारी दर्शविली. यावेळी समीर शेटे, गजानन शेलार, देवांग जानी, सचिन डोंगरे, सत्यम खंडाळे, मनीष महाकाळे, किशोर गरड, रामसिंग बावरी, गणेश बर्वे आदींनी पोलिसांशी चर्चा केली. यावर लेखी परवानगीची मागणी करण्यात आल्यावर पोलीस व महापालिकेने मंडप उभारणीच लेखी परवानगी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्याचे आवाहन करण्यात आले. त्यानंतर जमलेल्या गणेशभक्तांनी ढोल, ताशांच्या गजरात जल्लोष साजरा केला.(जोड)

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवNashikनाशिक