नाशिक : गणेश मंडळांना आता पोलिसांच्या परवानगीसाठी पोलीस ठाण्यामध्ये चकरा वा रांगेत उभे राहण्याची आवश्यकता नाही, ग्रामीणमध्ये यंदा प्रथमच आॅनलाइन पद्धतीने परवाने देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून, कार्यकर्त्यांनी तयारीला सुरुवात केली आहे़ पूर्वी गणेश मंडळांना विविध प्रकारच्या परवानग्यांसाठी वारंवार पोलीस ठाण्याच्या चकरा माराव्या लागत असत, यामध्ये होणारा वेळेचा अपव्यय लक्षात घेता महाराष्ट्र पोलिसांनी प्रथमच आॅनलाइन पद्धतीने परवाने देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे घरबसल्या आपल्या मोबाइलवरून किंवा घरातील लॅपटॉप, संगणकावरून नोंदणी करून पोलीस परवाना मिळविता येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी दिली आहे़ गणेश मंडळांना परवान्यासाठी आॅनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांच्या संकेतस्थळावर जाऊन ही नोंदणी करता येईल. यासाठी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सिटिझन पोर्टलचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. यामुळे काही अडचणी आल्यास तत्काळ त्या दूर केल्या जाणार आहेत. गतवर्षी जिल्हाभरात २ हजार ९८५ मंडळांनी एक गाव एक गणपती ही संकल्पना राबविली होती़
गणेश मंडळांना आता आॅनलाइन परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2018 1:31 AM