डांगसौंदाणे : येथील ग्रामपंचायत कार्यालयात गणेशोत्सवाच्या निमित्ताने पोलीस प्रशासन व गणेशोत्सव मित्रमंडळांची बैठक पार पडली.सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हिरामण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली येथील ग्रामपंचायत कार्यालयात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत एक गाव एक गणपती ही संकल्पना पोलिस निरीक्षक पाटील यांनी उपस्थित पोलीसपाटील, तंटामुक्त समिती, गणेशोत्सव मित्रमंडळ व ग्रामस्थांसमोर माडली. या संकल्पनेमुळे गणेशोत्सव मित्रमंडळामधील वादविवाद टळतात, अनावश्यक खर्चाला आळा बसतो, ध्वनीप्रदुषण टळते व सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे गांवात शांतता व एकोपा राहण्यासाठी मोठी मदत होते त्यामुळे त्यामुळे एक गांव एक गणपती ही संकल्पना राबविण्याचे आवाहन पाटील यांनी ग्रामस्थांना केले. पोलीस व जनतेमधील संबंध घट्ट व दृढ करण्यासाठी येत्या काळात आपण प्रयत्न करणार असून पोलीसच जनतेचा खरा मित्र असल्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना मदत करण्याचे आवाहन हि पो.नि.पाटील यांनी यावेळी केले.यावेळी सर्व ग्रामस्थ व मित्र मंडळ यांना विश्वासात घेऊन एक गांव एक गणपती हि संकल्पना आपण यावर्षी अमंलात आणू,असे संजय सोनवणे यांनी सांगितले.यावेळी गांवाच्यावतीने संजय सोनवणे यांच्या हस्ते पोलीस निरीक्षक हिरामण पाटील यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी रविंद्र सोनवणे, पंढरिनाथ बोरसे, सोपान सोनवणे, महेंद्र सोनवणे, संतोष परदेशी, रमेश बोरसे, महेश सोनवणे आदि उपस्थित होते.
डांगसौदाणे येथे गणेश मंडळांची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2017 12:08 AM