पंचवटी : लाडक्या गणरायाच्या आगमनाला आठवड्याचा कालावधी शिल्लक असल्याने पंचवटीतील जुन्या सार्वजनिक मित्रमंडळांनी गणेश देखावे साकारण्यासाठी जागा निश्चित करून मंडप उभारणीच्या कामाला सुरुवात केली आहे; मात्र यंदा प्रशासनाने गणेशोत्सव मंडळांवर काही जाचक अटी लादल्याने त्यातच वाढती महागाई, देणगीदारांची घटलेली संख्या यामुळे काही मंडळांनी गणेशोत्सवाच्या जागा बदलल्या तर काहींनी साध्या पद्धतीने देखावे साकारण्याची तयारी केली आहे. गणेशोत्सव तोंडावर असतानाही काही मंडळे देणगी जमा करण्यात तर काहींनी मंडप उभारणीचे कामदेखील सुरू न केल्याने यंदा मंडळे ‘बॅक’ फूटवर गेले आहेत.गणेशोत्सव म्हटला तर पंचवटीत जुने मंडळे आहे. धार्मिक, सांस्कृतिक देखावे दरवर्षी साकारले जातात. यंदा निवडणूक नसल्याने त्यातच मनपा प्रशासनाने लादलेल्या जाचक अटी, महागाई व देणगीदारांची कमी झालेली संख्या यामुळे गणेश मंडळांची कोंडी निर्माण झालेली आहे. काही मोठ्या ठरावीक मित्रमंडळांनी गणेशोत्सव देखावे साकारण्याच्या जागेवर नियमानुसार मंडप उभारणीचे काम केले असून, मुख्य रस्त्यालगतच्या मंडळांंची जागेमुळे अडचण निर्माण झाल्याने काही मंडळांनी जागा बदलून घेतल्या. काहींनी नियमांची पायमल्ली नको म्हणून मंडप उभारले; परंतु मोठे देखावे व दहा दिवस चालणारे सांस्कृतिक कार्यक्रम रद्द केले आहेत.दहा दिवस गणेशोत्सव कालावधीत नागरिकांसाठी विविध कार्यक्रम सादर करण्यासाठी मोकळी जागा लागते; मात्र पंचवटी परिसर गावठाण असल्याने कार्यक्रमासाठी जागा शोधायची कुठे, सांस्कृतिक कार्यक्रम करायचे की नाही या संभ्रमात पदाधिकारी सापडले आहे.
जाचक नियमांमुळे गणेशमंडळे बॅकफूटवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2018 1:12 AM
लाडक्या गणरायाच्या आगमनाला आठवड्याचा कालावधी शिल्लक असल्याने पंचवटीतील जुन्या सार्वजनिक मित्रमंडळांनी गणेश देखावे साकारण्यासाठी जागा निश्चित करून मंडप उभारणीच्या कामाला सुरुवात केली आहे; मात्र यंदा प्रशासनाने गणेशोत्सव मंडळांवर काही जाचक अटी लादल्याने त्यातच वाढती महागाई, देणगीदारांची घटलेली संख्या यामुळे काही मंडळांनी गणेशोत्सवाच्या जागा बदलल्या तर काहींनी साध्या पद्धतीने देखावे साकारण्याची तयारी केली आहे.
ठळक मुद्देजागा बदलल्या, साध्या देखाव्यांवर भर