नाशिक : शासकिय नियमांचे पालनव्हीआयपी आरती नाहीयंदा प्रबोधन उत्सवनाशिक- लाडका गणपत्ती बाप्पा येणार म्हंटले की आनंद उत्साहाचे वातावरण असते. यंदा कोरोनाच्या सावटाखाली उत्सव होत आहे. त्या पार्श्वभूमीवर नाशिक मध्ये गणेशोत्सव मंडळांनी मोठा उत्सवी थाट न करता माफक उत्सवकरण्याचे ठरविले आहे. स्वयंशिस्तीच्या या उत्सवात उत्साहाला मात्रमर्यादा नाही. यंदा आरोग्य शिबीराबरोंबरच गरीबांना मदत करणे असे आपल्याभागापुरते सामाजिक आणि प्रबोधनात्मक उत्सव साजरे करण्यात येणार आहे, एकप्रकाणे यंदा स्वयंशिस्तीने प्रबोधनोत्सवच साजरा करण्यात येणार असल्याचीमाहिती नाशिकच्या गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष समीर शेटे यांनी दिली. नाशिकमध्ये लहानमोठी सुमारे बाराशे गणेशोत्सव मंडळे आहेत. दरवर्षी गणरायाच्या आगमनाची चाहूल लागताच संपुर्ण शहरात सकारात्मक उर्जा जाणवूलागते. बाजारपेठा सजतात. गणरायांची नाना रूपे नागरीकांचे लक्ष वेधूनघेतात परंतु यंदा उत्सवाचे स्वरूप मर्यादीत करण्यात येणार आहे.त्यासंदर्भात समीर शेटे यांच्याशी साधलेला संवादप्रश्न- यंदाच्या गणेशोत्सवावर कोरोनाचा सावट आल्याने उत्सवावर मर्यादाआल्या असं वाटतं का?शेटे- गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट असले तरी उत्साहावर नाही, हे महत्वाचेआहे. मात्र, मंडळे सामाजिक जाणिव ठेवून काम करतात. त्यामुळे उत्सवातूनकोठे संसर्ग पसरू नये यासाठी यंदा विशेष काळजी घेतली जात आहे.नाशिकच्याबाबतीत सकारात्मक बाब म्हणजे यंदाचा उत्सव कसा असावा, त्यासाठी नियम कायहे शासनाने जाहिर करण्याच्या आतच नाशिकच्या गणेश मंडळानी एकत्र बैठक घेतली आणि उत्सव कसा साजरा करावा याबाबत स्वत:च आचारसंहिता तयार केलीआणि स्वत:हून पोलीस आयुक्तांची भेट घेऊन त्यांना यंदा माफक उत्सव साजराकरणार असल्याचे कळवले.मला वाटतं, राज्यात असा पुढाकार केवळ नाशिकमध्येच मंडळांनी घेतला.प्रश्न- गणेश मंडळे कोणती स्वयंशिस्त पाळणार आहेत?शेटे- गणेशोत्सव म्हंटला की मूर्ती पासूनच उत्सवाच्या भव्य स्वरूपालाप्रारंभ होतो. मंडप टाकले जातात. मोठे मंडळ उत्सवाच्या अगोदरच गणेशमूर्ती आणून ठेवतात. तीही मिरवणूक ीने. विद्युत रोषणाई, चलतचित्र देखावेअसे सारेच असते. परंतु यंदा अगोदरच नियमावली तयार केली. कोणीहीगणरायाच्या आगमनाची आणि विसर्जनाची मिरवणूक काढणार नाही. दहा बाय दहाकिंवा बारा आकाराचे मंडप असतील. शासकिय नियमानुसार अत्यंत छोट्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली जाईल. पुजे पुरताच मंडप उघडेल. गणेश भक्तांनाआॅनलाईन दर्शनाची व्यवस्था केली जाईल. इतक्या चांगल्या पध्दतीने आण् िास्वयंशिस्तीने उत्सव साजरा करण्यात येणार आहे.प्रश्न- यंदा अन्य उपक्रम नसतील का?शेटे- गर्दी खेचणारे कोणतेही कार्यक्रम होणार नाही. कोरोनासंदर्भातआरोग्य जागृतीचे फलक लावले जातील. बहुतांश मंडळे कोरोना संदर्भातप्रबोधन,अॅँटीजेन चाचण्या तसेच रक्तदान शिबीरे असे कार्यक्रम घेणारआहेत. सांस्कृतिक कार्यक्रम किंवा तत्सम कार्यक्रम होणार नाहीत.प्रश्न- महापालिकेकडून काय अपेक्षा आहे?शेटे- गणेश मंडळे स्वयंशिस्तीने उत्सव साजरा करीत आहेत. मात्र,विसर्जनाच्या दिवशी नागरीकांनी नदी काठी येऊ नये यासाठी गणेशोत्सवमहामंडळ प्रयत्न करीत आहे. त्याला महापालिकेने साथ द्यावी, नदी काठीकृत्रिम तलाव केले तरी नागरीक याठिकाणी येतील. त्यामुळे प्रभागाप्रभागातठिकठिकाणी कृत्रिम तलाव तयार करावेत. गणेश मंडळांचे कार्यकर्ते घरोघरजाऊन मूर्ती संकलीत करून विसर्जन होत असलेल्या ठिकाणी आणून देतील. दुसरीबाब म्हणजे महापालिका केवळ अनंत चतुर्दशीच्या दिवशी होणा-या विसर्जनाचीचदरवेळी तयारी करते. परंतु लाखो लोक घरी एक दिवस, दीड दिवस,पाच दिवस आणिगौरी विसर्जनापर्यंतचे गणपती प्रतिष्ठापीत केले जातात. त्यांच्याविसर्जनाच्या दिवशी कोठेही नदीकाठी निर्माल्य कलश, कृत्रिम तलाव आणिविसर्जित मूर्ती दान स्विकारण्याची व्यवस्था नसते. ती करण्यासाठी महामंडळप्रयत्न करणारअसून यासंदर्भात महापालिकेला निवेदन देखील देण्यात येणारआहे. त्यासाठी आता महापालिकेने सहकार्य केले पाहिजे.
(मुलाखत - संजय पाठक)