नाशिक : ‘विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले’ असे म्हणणाऱ्या महात्मा जोतिराव गोविंदराव फुले ऊर्फ जोतिबा फुले यांची जयंती बुधवारी (दि.११) साजरी होत आहे. गणेशवाडी, पंचवटी परिसरात असलेला फुले यांचा अर्धाकृती पुतळा शहरातील अत्यंत जुना असून, या पुतळ्याचे अनावरण १९५१ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले होते. ज्येष्ठ मराठी लेखक, विचारवंत व जनतेचे महात्मा असलेले जोतिबा फु ले यांनी महाराष्टÑात स्त्रियांना शिक्षणाची कवाडे खुली करून देत समतेचा नारा बुलंद केला. १९५१ साली पंचवटीतील गणेशवाडी भागात त्या वेळच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत फुले यांचा अर्धाकृती पुतळा उभारला. जेणेकरून येणाºया पिढीला म. फुले यांचे कार्य स्मरणात रहावे आणि त्यांनी त्या कार्यातून प्रेरणा घेत समाजहितासाठी योगदान द्यावे, हा त्यामागचा महत्त्वाचा उद्देश होता. या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण फुले यांना गुरूस्थानी मानणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले. येथील रस्त्याला म. फुले यांचे नाव देण्यात आले. त्यावेळी कार्यकारी मंडळाच्या संस्थापक अध्यक्षपदी बाबुराव गिते होते तर कार्यकारी मंडळात कर्मवीर बी. के. गायकवाड, गोपाळराव शिंदे आदींचा समावेश होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलेला गणेशवाडीमधील महात्मा फुलेंचा पुतळा फुले-शाहू-आंबेडकर चळवळीला बळ देणारा ठरत आहे; मात्र काळाच्या ओघात याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. या पुतळ्याचे सौंदर्यीकरण व विकासाकडे अद्याप प्रशासनाचे लक्ष गेलेले नाही. परिसरातील युवकांनी फुले यांच्या पुतळ्याला रोषणाई केली आहे. या पुतळ्याभोवती सुशोभिकरण करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींसह फुलेंच्या स्मृती महापालिकेने जोपासणे गरजेचे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाज अन् राष्टÑाच्या विकासासाठी विविध सत्याग्रह, आंदोलने उभारुन लढा दिला. संपूर्ण आयुष्य त्यांनी राष्टÑ उद्धारासाठी वेचले. नाशिकमध्ये १९५१ साली दुर्मीळ योग आला तो म्हणजे बाबासाहेबांनी स्वत: महात्मा फुले यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. नाशिकमध्ये गणेशवाडी येथे असलेला म. फुले यांचा पुतळा ६७ वर्षांनंतरही डॉ. आंबेडकर यांच्या नाशिकभेटीच्या स्मृती जपत असून भावीपिढीला प्रेरणा देत आहे.
गणेशवाडी : १९५१ साली आंबेडकर यांच्या हस्ते झाले होते अनावरण बाबासाहेबांच्या स्मृती जपणारा महात्मा फुलेंचा पुतळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 1:08 AM
नाशिक : ‘विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले’.
ठळक मुद्देपुतळ्याचे अनावरण १९५१ साली अनावरण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते