शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
2
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
4
Vinod Tawde: तावडे आलेल्या त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
5
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
6
...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला
7
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
10
अजबच! सहा हजारांच्या लाच प्रकरणी सरकारी कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर ५ वर्षांनी शिक्षा
11
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
12
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
13
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
14
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
15
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
16
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
17
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
18
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; आरोपीने सांगितलं नाव, कोण होता मास्टरमाइंड?
19
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
20
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?

परराज्यातील गुन्हेगारांच्या टोळीच्या मुसक्या आवळल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2019 5:56 PM

लुटारूंच्या टोळीने आगळीवेगळी शक्कल लढवून भरदिवसा हजारो ते लाखो रूपयांची लूट करण्याचा सपाटा लावला होता. पंधरवड्यापुर्वीच सरकारवाडा, मुंबईनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या दोन गुन्ह्यांसह औरंगाबादमधील तीन गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.

ठळक मुद्देपावणे नऊ लाखांचा मुद्देमालटोळीकडून अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता

नाशिक : शहरात आठवडाभरापुर्वी एकाच दिवशी एकाच वेळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी एकाच पध्दतीने वाहनचालकांच्या लूटीच्या घटना घडल्या होत्या. या गुन्ह्यांमधील लूटीचे कारण एकसमान असल्याचे तपासात पुढे आल्यानंतर गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने तपास सुरू करत परराज्यातील गुन्हेगारांच्या टोळीच्या मुसक्या यापक्ररणी आवळल्या आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ‘तुमच्या वाहनातून आॅइल गळती होत आहे’, असे सांगून वाहनचालकांचे लक्ष विचलीत करून वाहनामध्ये ठेवलेल्या रोकड व महागड्या वस्तूंच्या बॅग लंपास करण्याच्या घटना काही दिवसांपुर्वी शहरात घडल्या होत्या. या गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी गुन्हे शाखेचे पथक संशयितांच्या मागावर होते. दरम्यान, दिल्ली येथील पाच संशियतांना पथकाने अटक केली. यामध्ये संजय मुनियांदी (३०), बबलू फकीरा (३५), किसन सेलूराज (३०), करण गणेश (३०), अभिमन्यु बबलू (१९, सर्व रा. दिल्ली) यांच्यासह एक अल्पवयीन संशियताचा या टोळीत समावेश आहे. यांच्यासह एका अल्पवयीन संशियतास सहायक पोलीस निरिक्षक महेश कुलकर्णी व त्यांच्या पथकाने शिर्डीमधून ताब्यात घेतले आहे. लुटारूंच्या टोळीने आगळीवेगळी शक्कल लढवून भरदिवसा हजारो ते लाखो रूपयांची लूट करण्याचा सपाटा लावला होता. पंधरवड्यापुर्वीच सरकारवाडा, मुंबईनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या दोन गुन्ह्यांसह औरंगाबादमधील तीन गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. या टोळीकडून अशाप्रकारचे अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही.--पावणे नऊ लाखांचा मुद्देमालगुन्हे शाखा युनीट-१च्या पथकाने संशयितांच्या मुसक्या आवळून त्यांची कसून झडती घेत त्यांच्याकडून मुंबईनाका पोलीस ठाणे हद्दीतील चांडकसर्कलवर घडलेल्या गुन्ह्यातील ७०ग्रॅम सोन्याच्या दोन पाटल्यांसह सरकारवाडा हद्दीतील गुन्ह्यातील रोख रक्कमेपैकी ५९ हजाराची रोकड, २ आॅईल बॉटल, १ कुलंट बॉटल, लहान रंगाचा डबा, ५मोबाईल असा एकूण ८ लाख ७४ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारीArrestअटक