पांडाणे -महाशिवरात्रीच्या पर्वकाळ साधून धर्माचार्य प्रभू दादा व धर्माचार्य रमाबा यांच्या साधकांतर्फे पंचवटी ते आच्छावणी (गुजरात) येथील श्री श्रेत्र प्रगटेश्वर महादेव मंदीरावर महाशिवरात्रीच्या पर्वकाळावर गंगाजल व गोदावरीच्या तिर्थाचा अभिषेक करण्यात येणार आहे. या दिंडीची सुरूवात धर्माचार्य प्रभू दादा यांच्या हस्ते करण्यात आली असून या दिंडी सोहळ्यात कावडीने गंगाजल देण्यात येणार असल्याचे स्वप्नील चंद्रात्रे यांनी सागितले. नाशिक येथून पायी दिंडी निघाली. ती ४ मार्च रोजी आच्छावणी गुजरात येथे पोहचणार असून या कालावधीत जागो शिवजप व शिव आराधना होणार असून या पायी दिंडी सोहळ्यात एक लक्ष आठ हजार रु द्राक्षमणीचा मोठी महादेव पिंडचा रथ या दिंडी सोबत असल्यामुळे भाविकांनी दर्शनासाठी मोठी रांग लागली होती. जिल्हयातील धर्माचार्य प्रभू दादांच्या साधक बंधू भगिनी व ज्येष्ठ नागरिक पायी दिंडीत सहभागी झाले आहेत. हा पायी दिंडी सोहळा नाशिक पिंपळनारे दिंडोरी लखमापूर फाटा , ओझरखेड ,कृष्ण गाव,वणी , पांडाणे , माळे दुमाला, पिंपरी अंचला, हरण टेकडी , हनुमंत माळ , जाभुळमाळ , व आच्छावणी प्रगटेश्वर महादेव मंदीर येथे अभिषेक करणार आहे.
महाशिवरात्रीसाठी कावडीने गंगाजल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 2:43 PM