नाशिक : श्री स्वामी समर्थ सेवामार्ग आणि गंगा गोदावरी पुरोहित संघाच्या वतीने मंगळवारी (दि.२२) सायंकाळी, गंगा दशहरा उत्सवानिमित्ताने रामकुंडावर गंगापूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी गुरु माउली अण्णासाहेब मोरे यांच्या उपस्थितीत सेवेकरी पर्जन्य सुक्ताचे पाठ करून पर्जन्यराजास साकडेही घालणार आहेत.ज्येष्ठ महिन्यातील शु. १ ते १० या कालावधीत सर्वत्र गंगा दशहरा उत्सव साजरा करून गंगापूजन केले जाते. गंगा गोदावरी मातेचे उगमस्थान त्र्यंबकेश्वर ते ती सागरास मिळते ते पवित्र स्थळ राजमहेंद्री (अांध्र प्रदेश) अशा शेकडो मैलांच्या गोदाकाठावर आहे. जेथे जेथे शक्य होईल तेथे समर्थ सेवेकरी व भाविक गंगापूजन करणार आहेत. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी गोदावरी नदी नाही अशाठिकाणी त्या त्या गावातून प्रवाहित होणाऱ्या नद्यांचे पूजन समर्थ सेवेकरी करणार आहेत.गेली पन्नास ते साठ वर्ष अखंडपणे गंगापूजनाची परंपरा जोपासणाºया सेवेकºयांनी दुपारी गंगापूररोडवरील उदयनगर समर्थ केंद्रातून गंगाजल कलशाच्या मिरवणुकीचे आयोजन केले आहे. ही मिरवणूक रामकुंडावर पोहोचल्यानंतर गुरु माउली अण्णासाहेब मोरे यांच्या हस्ते गंगापूजनाचा प्रमुख सोहळा संपन्न होईल.
समर्थ सेवा मार्गाच्या वतीने आज गंगापूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 1:02 AM
नाशिक : श्री स्वामी समर्थ सेवामार्ग आणि गंगा गोदावरी पुरोहित संघाच्या वतीने मंगळवारी (दि.२२) सायंकाळी, गंगा दशहरा उत्सवानिमित्ताने रामकुंडावर गंगापूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी गुरु माउली अण्णासाहेब मोरे यांच्या उपस्थितीत सेवेकरी पर्जन्य सुक्ताचे पाठ करून पर्जन्यराजास साकडेही घालणार आहेत.
ठळक मुद्देगुरु माउली अण्णासाहेब मोरे यांच्या हस्ते गंगापूजनाचा प्रमुख सोहळा