शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

आयुक्तांनी वादग्रस्त निर्णय मागे घेतला, पाईपलाईन निविदा प्रक्रियेला ‘ब्रेक’

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2023 11:21 AM

अद्याप या योजनेची निविदा प्रसिध्द होऊ शकली नाही. दरम्यान, आयुक्तांनी वादग्रस्त निर्णय मागे घेतल्याने त्यावर आता काम सुरु होणार असल्याचे समजते.

नाशिक (सुयोग जोशी) : महापालिका आयुक्तांनी महिनाभरापूर्वी तांत्रिक संवर्गातील पाणीपुरवठा विभाग विविध कर विभागाच्या अधिनस्त आणण्याचा निर्णयाचा फटका थेट गंगापूर धरण जलवाहिनी योजना निविदेला बसला आहे. उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याकडे निविदा प्रक्रिया मंजुरीची फाईल पाठवणे मान्य नसल्याने या योजनेच्या निविदाप्रकियेसाठी चार सदस्यीय गठित समितीने यावर कोणतेही काम केले नाही. त्यामुळे अद्याप या योजनेची निविदा प्रसिध्द होऊ शकली नाही. दरम्यान, आयुक्तांनी वादग्रस्त निर्णय मागे घेतल्याने त्यावर आता काम सुरु होणार असल्याचे समजते.

गंगापूर धरण ते बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्र दरम्यान साडेबारा किलोमीटर लांबीची व अठराशे मिलिमीटर व्यासाची नवीन लोखंडी पाइपलाइन टाकली जाणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारच्या पंधराव्या वित्त आयोगाकडून निधी प्राप्त होणार आहे.जवळपास २११ कोटी रुपयांच्या खर्च येणार आहे.योजनेला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून तांत्रिक मान्यताही मिळाली असून नाशिक शहराची २०५५ पर्यंतची लोकसंख्या गृहित धरून या नवीन जलवाहिनीचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यास आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महासभेने दोन महिन्यांपूर्वीच मान्यता दिली.

आयुक्तांनी तत्कालीन प्रभारी अधीक्षक अभियंता उदय धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय निविदा समिती स्थापन केली. समितीकडून निविदा प्रक्रिया राबवली जाणार होती. त्यावर काम देखील सुरु झाले होते. पण मागील सहा सप्टेंबरला आयुक्तांनी तांत्रिक संवर्गातील पाणी पुरवठा विभाग विविध कर विभागाच्या अधिनस्त आणण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे स्थानिक विरुध्द परसेवेतील अधिकारी असा सुप्त संघर्ष निर्माण झाला. त्याचा फटका गंगापूर धरण थेट जलवाहिनी योजनेला बसला.लवकरच सुरू होणार काम

निविदा तयार केल्यानंतर उपायुक्त दर्जाच्या अधिकार्याकडे फाईल तपासणी व मंजुरीसाठी पाठवावी लागणार होती. त्यामुळे निविदेसाठी गठित केलेल्या समितीने त्यावर काम करणे टाळत एकप्रकारे उपायुक्तांचे अधिपत्य नाकारले. अतांत्रिक श्रेणीतील अधिकार्याकडे तांत्रिक संवर्गातील फाईल कशी पाठवायची असा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्यामुळे निविदा प्रक्रिया रखडली. दरम्यान, आयुक्त डाॅ. करंजकर यांच्या स्थानिक विरुध्द परसेवा वादाचे लोण पसरते पाहून हा वादग्रस्त निर्णय मागे घेतला. त्यामुळे सबंधित समितीकडून गंगापूर थेट जलवाहिनी योजनेचे निविदेचे काम पुन्हा सुरु केले जाणार असल्याचे समजते.