नाशिक : गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत २९ जानेवारी रोजी बबन बेंडकुळे (२५) या तरुणावर प्राणघातक हल्ला झाला होता. या हल्ल्यात बबन गंभीर जखमी झाला होता. ११ फेब्रुवारी रोजी त्याच्यावर उपचार सुरू असताना रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार आकाश सुरेश पवार (२७, शिवाजीनगर) हा मागील चार महिन्यांपासून फरार होता. गंगापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने मनमाड रेल्वेस्थानकावरून त्याच्या मुसक्या आवळल्या.गंगापूर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक चार महिन्यांपासून आकाशच्या मागावर होते. आकाश हा सराईत गुन्हेगार असून, त्याने यापूर्वीही गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकावर प्राणघातक हल्ला करून खुनाचा प्रयत्न केला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. खुनाच्या गुन्ह्यात तुषार दिनेश लांडे याच्या मदतीने आकाश याने बबनवर प्राणघातक हल्ला केला होता तेव्हापासून तो फरार झाला होता. त्याच्या अटकेनंतर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य सुत्रधाराला गंगापूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 7:09 PM
गंगापूर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक चार महिन्यांपासून आकाशच्या मागावर होते. आकाश हा सराईत गुन्हेगार असून, त्याने यापूर्वीही गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकावर प्राणघातक हल्ला करून खुनाचा प्रयत्न केला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.
ठळक मुद्देचार महिन्यांपासून फरार होता गंगापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने मनमाड रेल्वेस्थानकावरून मुसक्या आवळल्या.गुन्हे शोध पथक चार महिन्यांपासून आकाशच्या मागावर