शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
3
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
4
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
5
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
6
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
7
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
8
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
9
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
10
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
11
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
12
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
13
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
14
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
15
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
16
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
17
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
18
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
19
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
20
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप

गंगापुरचा जलसाठा ६३ टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 1:40 AM

शहर व परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाचा जलसाठा हा रविवारी (दि.२५) रात्री ८ वाजेपर्यंत ६३.६२ टक्क्यांवर पोहचला होता. गंगापूर धरणात सध्या ३ हजार ५८२ दलघफु इतका पाणीसाठा आहे. शनिवारच्या तुलनेत रविवारी दिवसभर धरणाच्या परिसरात पावसाचा जोर काहीसा ओसरला होता. शहरातदेखील दिवसभर पावसाच्या सरींची टप्प्याटप्प्याने हजेरी सुरूच होती.

ठळक मुद्देदिवसभर सरींचा वर्षाव : पुढील तीन दिवस मध्यम स्वरूपाच्या पावसाचे

नाशिक : शहर व परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाचा जलसाठा हा रविवारी (दि.२५) रात्री ८ वाजेपर्यंत ६३.६२ टक्क्यांवर पोहचला होता. गंगापूर धरणात सध्या ३ हजार ५८२ दलघफु इतका पाणीसाठा आहे. शनिवारच्या तुलनेत रविवारी दिवसभर धरणाच्या परिसरात पावसाचा जोर काहीसा ओसरला होता. शहरातदेखील दिवसभर पावसाच्या सरींची टप्प्याटप्प्याने हजेरी सुरूच होती.

शहर व परिसरात अधूनमधून ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम सरींचा वर्षाव शनिवारप्रमाणेच नाशिककरांना अनुभवयास आला. अवघ्या पाच ते दहा मिनिटांसाठी वेगाने सरी काेसळल्यानंतर काही मिनिटांकरिता सूर्यप्रकाशदेखील शहरासह काही उपनगरांमध्येही पहावयास मिळाला. दिवसभरात ४.० मिमी इतका पाऊस पडल्याची नोंद हवामान केंद्राकडून करण्यात आली.

शहरात गुरुवारपासून पावसाने उघडीप दिली होती; मात्र शनिवारपासून पावसाने पुनरागमन केले आहे. दिवसभरात कोठे दमदार मध्यम सरींचा वर्षाव तर कोठे हलक्या सरींचा वर्षाव होत असल्याने नाशिककरांना पावसाळा अनुभवयास मिळत आहे. शहरासह उपनगरांमधील रस्त्यांवरून पाणी वाहत असून, सर्व परिसर ओलाचिंब भिजलेला नजरेस पडत आहे. हवामान खात्याकडून नाशिकमध्ये येत्या मंगळवारपर्यंत (दि.२७) हलक्या ते मध्यम सरींचा कमी-अधिक प्रमाणात वर्षाव होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसेच घाटमाथ्याच्या परिसरात पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यताही वर्तविली गेली आहे.

नाशिक शहराची तहान भागविणाऱ्या गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने गंगापूर धरणाचा जलसाठा रविवारी ६१, तर रात्री ६३.६२ टक्के इतका झाला होता.

--इन्फो--

धरण परिसरातील पाऊस असा...

गंगापूर-४० मिमी

काश्यपी-१७मिमी

गौतमी-३० मिमी

त्र्यंबक-२९ मिमी

आंबोली- ४८ मिमी

-

टॅग्स :Nashikनाशिकgangapur damगंगापूर धरणRainपाऊस