संजय पाठक नाशिक- गंगोत्रीला गेलेल्या नाशिक मधील भाविकांच्या मार्गातच एक दुर्घटना घडली. गंगोत्री मार्गावर दरड कोसळल्याने अनेक गाड्या त्याखाली दबल्या गेल्या मात्र, नाशिकमधील याठिकाणी असलेले २६ भाविक सुरक्षीतरीत्या बाहेर पडले. आता हे सर्व जण उत्तर काशी येथे पाेहोचले आहेत.
सध्या शाळा- महाविद्यालयांना सुटी असल्याने नागरीक माेठ्या प्रमाणात धार्मिक पर्यटनासाठी बाहेर पडले आहेत. नाशिक मधील २६ भाविकांचे एक पथकगंगोत्री आणि काशी येथे दर्शनासाठी २६ मेस नाशिकमधून बाहेर पडले होते. शुक्रवारी (दि.३१) गंगोत्री मार्गावर हर्षल येथे दरड काेसळल्याने गोंधळ उडाला. अनेक मोटारींवर दरडीचे दगड काेसळल्याने त्यांचा चक्काचूर झाला. मात्र, दरड कोसळण्याच्या घटनास्थळापासुून १५ किमी अंतरावर नाशिकचे भाविकहोते. परंतु दुर्घटना घडल्यानंतर सुरक्षीत आहोत हे देखील त्यांना सांगता येते नव्हते कारण इंटरनेट सेवाच ठप्प झाली होती. त्यामुळे त्यांचे कुटूंबिय चिंतेत होते. मात्र लष्कराने दरड हटवल्यानंतर मार्ग मोकळा झाल्याची माहिती तान या पर्यटक संस्थेचे माजी अध्यक्ष दत्ता भालेराव यांनी सांगितले.
हे सर्व भाविक आता उत्तर काशी येथे असून सर्वांचा प्रवास सुरळीत सुरू असल्याचे भालेराव यांनी सांगितले.