पंचवटी : दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले सहा जणांचे टोळके हिरावाडी भागात संशयास्पदरीत्या फिरत असल्याचे पंचवटी पोलीस ठाण्याच्या गस्त पथकाला आढळून आले. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास भिकु सा पेपर मिलच्या पाठीमागील नाल्यावर सहा संशयितांचे टोळके दरोड्याची तयारी करत असल्याची माहिती गुन्हे शोध पथकाला मिळाली होती. सर्व संशयित हे फुलेनगर झोपडपट्टीमधील रहिवासी असून यामध्ये सागर गणपत बोडके, सागर रामदास येलचित्ते, भूषण भगवान गांगुर्डे, गणेश गौतम गायकवाड, गणेश झुंबर अहेर, मुकुं द संभाजी चित्ते यांचा समावेश आहे. नाल्यालगतच्या मोकळ्या मैदानात हे टोळके बसून धारधार हत्यारे, नायलॉन दोरी, मिरचीची पूड, मद्याच्या रिकाम्या बाटल्या आदि साहित्याची जमवाजमव करत दरोड्याचा कट रचत होते. याचवेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश सपकाळे, पोलीस निरीक्षक अशोक मेश्राम, विजय गवांदे, सचिन म्हसदे, संतोष वसावे, भास्कर गवळी आदिंनी सापळा रचून सहाही संशयितांच्या मुसक्या आवळल्या.
दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद
By admin | Published: February 18, 2016 11:27 PM