पंचवटी : येथील मखमलाबाद वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष व ग्रंथमित्र रामचंद्र अर्जुन काकड (८०) यांचे गुरु वारी (दि.१८) सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. ते गत काही दिवसांपासून आजारी होते. दुपारी मखमलाबाद स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, तीन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे़यावेळी जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील शोकाकूल मान्यवरांनी मनोगतात ग्रंथालय चळवळीत काम करणारा ज्येष्ठ कार्यकर्ता हरपल्याची भावना व्यक्त केली. रामचंद्र काकड हे उपक्रमशील शिक्षक व ग्रंथपाल म्हणून नाशिककरांना परिचित होते़ वाचनालयात विविध निवड ग्रंथ उपलब्ध व्हावेत म्हणून ते स्वत: लक्ष घालत असत़ मविप्र समाज संस्थेत शिक्षक म्हणून २० वर्षे नोकरी केली. शेती, वाचन व सहकार चळवळीत महत्त्वपूर्ण योगदान दिले. १९६५मध्ये शेतकरी बांधवांसाठी कृषी विकास मंडळ उपक्र म सुरू केला. १५ आॅगस्ट १९६९ मखमलाबाद सार्वजनिक वाचनालयाची स्थापना करत ग्रंथालय चळवळीला प्रारंभ केला. त्यांनी मखमलाबाद सोसायटी संचालक, अध्यक्ष, सेंट्रल गोदावरी कृषक सेवा संस्था संस्थापक संचालक, अध्यक्ष, नाशिक बाजार समिती संचालक, जिल्हा ग्रंथालय संघ संस्थापक संचालक गेल्या २३ वर्षांपासून बिनविरोध अध्यक्ष म्हणून कामगिरी बजावत होते. १९७९ मध्ये तत्कालीन राज्यपाल सादिक अली यांच्या हस्ते शेतीनिष्ठ पुरस्काराने त्यांना सन्मानित केले होते. ग्रामस्थ कृती समिती स्थापन करून धरणे, आंदोलने, मोर्चे व शेतकरी परिषदा घेतल्या.
ग्रंथमित्र रामचंद्र काकड यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 12:20 AM