शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

गर्दी जमली म्हणजे मते मिळालीच असे नव्हे !

By श्याम बागुल | Published: January 15, 2019 3:32 PM

कोरेगाव भीमा येथील गेल्या वर्षाच्या जातीय दंगलीनंतर दलित संघटनांच्या डझनभर नेत्यांपैकी फक्त प्रकाश आंबेडकर यांनी ठोस भुमिका घेत दलीतांच्या बचावासाठी महाराष्टÑ बंदची हाक दिली व त्याला अभुतपूर्व प्रतिसाद मिळाला. या एकमेव घटनेतून दलित समाज एकाएकी एकत्र येण्यास सुरूवात झाली,

ठळक मुद्दे दलीतांना एमआयएमची कट्टर धर्मांधता मानवेल काय नाशिक येथे प्रकाश आंंबेडकर यांची सभा ज्या भव्य-दिव्य व प्रचंड गर्दीने पार पडली

श्याम बागुलनाशिक : दलीतांना काळाराम मंदिराचे कवाडे खुली करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ज्या नाशिकच्या भुमीत सत्याग्रह करण्याची वेळ आली,त्याच भुमीत त्यांचे नातु अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आगामी लोकसभा व विधासभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून एमआयएमसोबत जाहीर सभा घेवून घडविलेले शक्तीप्रदर्शनाने अन्य राजकीय पक्षांच्या छातीत धडकी भरणे स्वाभाविक असले तरी, ज्या सत्तेविरूद्ध प्रकाश आंबेडकर दलित-मुस्लिमांना एकत्र करून रान पेटवित आहे, त्या दलीतांना एमआयएमची कट्टर धर्मांधता मानवेल काय हाच खरा प्रश्न आहे. त्यामुळे जाहीरसभेपुरती मोठी गर्दी जमली म्हणजे त्याचे रूपांतर मतांमध्ये होतेच असे नाही, या अनेकांच्या अनुभवाशी प्रकाश आंबेडकरांना निवडणुकीनंतर सहमत व्हावेच लागेल.कोरेगाव भीमा येथील गेल्या वर्षाच्या जातीय दंगलीनंतर दलित संघटनांच्या डझनभर नेत्यांपैकी फक्त प्रकाश आंबेडकर यांनी ठोस भुमिका घेत दलीतांच्या बचावासाठी महाराष्टÑ बंदची हाक दिली व त्याला अभुतपूर्व प्रतिसाद मिळाला. या एकमेव घटनेतून दलित समाज एकाएकी एकत्र येण्यास सुरूवात झाली, त्याचाच नेमका फायदा प्रकाश आंबेडकरांनी उठविला व खऱ्या अर्थाने त्याचे राजकीयकरण सुरू झाले. केंद्र व राज्य सरकार विरोधातील वातावरणाचा लाभ एकीकडे घेत असताना दुसरीकडे समविचारी पक्षांसोबत निवडणूक लढविण्याची तयारी आंबेडकर यांनी दर्शविली परंतु त्यांच्या या तयारीकडे आजही दलीत समाज संशयाने पाहत आहे. कॉँग्रेसशी निवडणूक बोलणी करायची परंतु राष्टÑवादी नको असे दुसरीकडे म्हणायचे, लोकसभेत आंबेडकरांचा एकही प्रतिनिधी नसताना थेट बारा जागांची मागणी करायची व अचानक एमआयएम या पक्षाशी निवडणूक युती करून प्रचाराचा रणश्ािंग फुंकायचा, त्याच बरोबर नको असलेल्या राष्टÑवादीचे नेते छगन भुजबळ यांची भेट घेवून राजकीय चर्चा घडवाची, जाहीर सभेतून सेना-भाजपावर टोकाची टिका करून त्यांना निवडणूक युतीसाठी एकत्र येण्यासाठी भाग पाडायचे अशा एक नव्हे एकाच वेळी अनेक खेळी प्रकाश आंबेडकर खेळत आहे. त्यामुळे त्यांच्या एकूणच भूमिकेविषयी संशय व्यक्त होणे साहजिक असून, भारतीय संविधानाला दुय्यम स्थान देवून कट्टर धर्मांधता जोपासणा-या एमआयएम यासारख्या पक्षाला सोबत घेण्याची त्यांची भूमिकाही तितकीच अनाकलनीय आहे. एकीकडे संविधानाला हात लावण्यास विरोध करायचा व दुसरीकडे संविधानाला आव्हान देणा-या पक्षाबरोबर निवडणूक युतीचा समझोता करायचा हा आंबेडकर यांच्या दुटप्पीपणाबाबत दलीत समाजात संभ्रम आहे. नाशिक येथे प्रकाश आंंबेडकर यांची सभा ज्या भव्य-दिव्य व प्रचंड गर्दीने पार पडली त्याबाबत त्यांचे कितीही कौतुक केले तरी ते कमीच आहे, कारण गोल्फ क्लब मैदानावर सभा घेण्याचे धाडस ज्या काही मोजक्याच पक्षांमध्ये आहे त्यात प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीला स्थान मिळाले आहे. आंबेडकर यांनी निवडणूक पुर्व तयारीत मारलेली बाजी यशस्वी ठरली असली तरी, याच गोल्फ क्लबच्या मैदानावर लाखोंच्या सभा घेणा-या राजकीय पक्षांना मात्र निवडणुकीत सभेतील गर्दी इतकी मते मिळाली नाहीत हा देखील इतिहास आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिकPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरBhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन