लासलगाव : येथील राजस्थानी महिला मंडळाच्यावतीने गणगौर हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. होळीपासून ते पाडव्याच्या दुस-या दिवसापर्यंत म्हणजे १८ दिवस दररोज गणगौर निमित्त राममंदिरापासून ते बाजारपेठेतून लक्ष्मीनारायण मंदिरापर्यंत डोक्यावर कळस घेऊन शोभायात्रा काढण्यात येते. यात महिला मोठ्या प्रमाणात सहभागी होतात . पार्वती ह्या माहेराला जातात व त्या जेवणाला न थांबताच परत तश्याच सासरी येतात.. त्यावेळी महादेव पार्वतीला विचारतात का तू काय जेवण केले, पार्वतीचे माहेरचे घर गरीब असते. पार्वती महादेवाला सांगत नाही ,म्हणून महादेव यांच्या लक्षत येते की पार्वतीने फक्त भाजीपोळीचे जेवण केले असावे. म्हणजे महादेव आणि पार्वतीच्या गोष्टीतून ही गोष्ट लक्षात येते की सासरची गोष्ट माहेरला आणि माहेराची गोष्ट सासरला सांगू नये . तेव्हापासून गणगौरचा हा सण साजरा करतात .गणा म्हणजे भगवान शंकर आणि गौरी म्हणजे देवी पार्वती. म्हणून या दिवशी भगवान शंकर आणि गौरी म्हणजे पार्वतीची पूजा करतात. या दिवशी कुमारिका चांगला पती भेटण्यासाठी गौरीची पूजा करतात आणि विवाहित स्त्रिया त्यांच्या पतीसाठी चांगले स्वास्थ आणि दीर्घायुष्यसाठी प्रार्थना करतात .
लासलगावी राजस्थानी महिला मंडळाच्यावतीने गणगौर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2019 12:48 PM