दाभाडी : मालेगाव तालुक्यातील गरबड गावात आदिवासी विचार मंच व एकलव्य संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चिंतामण भांगरे होते. प्रमुख अतिथी म्हणून विष्णू भांगरे, भीमराव भांगरे, झेलाबाई सोनवणे, नाना रगतवाण, संजय भांगरे उपस्थित होते. यावेळी धरती आबा बिरसा मुंडा, आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे, भगवान वीर एकलव्य, राणी दुर्गावती, खाजा नाईक यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविक गोरख नाडेकर यांनी केले. आनंदा माळी, समाधान गुमाडे, गोरख भांगरे यांनी, पांडुरंग गुमाडे, नितीन गुमाडे यांनी आदिवासी दिनाचे महत्त्व सांगितले. यावेळी सुभाष गुमाडे, बापू वेडेकर, विष्णू गुमाडे, पोपट भांगरे, वसंत भांगरे, धाकू नाडेकर, प्रल्हाद पेढेकर, प्रसाद गुमाडे, लक्ष्मण पेढेकर, भीमा माळी, सुरेश गुमाडे, दगा सोनवणे ,चुणीलाल भांगरे, नितीन गायकवाड, गुलाब भांगरे, रंगनाथ भोईर,भावडू गुमाडे, समाधान बगाड, देवीदास कावळे, शरद गुमाडे, बाबाजी माळी, भीमा माळी, गोविंदा गुमाडे, अमोल सोनवणे, रामदास घोडे,रोहित सारुकते, निवृत्ती घोडे, काकाजी भांगरे, जितेंद्र रगतवाण, काशीनाथ गुमाडे, संजय सोनवणे आदींसह समाजबांधव उपस्थित होते. बजरंग गुमाडे यांनी सूत्रसंचालन केले. नागेश गुमाडे यांनी आभार मानले.
गरबडला जागतिक आदिवासी दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2020 6:45 PM
दाभाडी : मालेगाव तालुक्यातील गरबड गावात आदिवासी विचार मंच व एकलव्य संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला.
ठळक मुद्देप्रतिमांचे पूजन करण्यात आले.