ओझर : सध्या ओझरमधील सर्वाधिक चर्चेचा मुद्दा उपस्थित होतोय तो म्हणजे कचरा डेपोमुळे होणाऱ्या त्रासाचा. येथे जुन्या सायखेडा रोडजवळील अनुसया पार्कला लागून असलेल्या कचरा डेपोच्या दुर्गंधीने अनेकजण हैराण झाले आहेत. त्यामुळे परिसरात आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.ओझर येथे बाणगंगा नदीकिनारी मारुती वेस स्मशानभूमीमागे व जुन्या सायखेडा रोडला लागून कचरा डेपो असून, गावातील तसेच उपनगरांतील सर्व कचरा हा घंटागाडीने तेथे आणून टाकला जातो. परंतु गावचा वाढता विस्तार व दररोज हजारो किलो जमा होत असलेला ओला व सुका कचरा हा सदर ठिकाणी आणून टाकला जात असताना त्याची विल्हेवाट लावण्यात मोठी कसरत होत असल्याचे दिसत आहे. त्यात ओला व सुका कचरा एक होत असल्याने जागेची प्रचंड कमतरता होत आहे. कचरा डेपोला लागूनच वसाहत आहे, तर नदीपलीकडे शेती व शेलार, शिंदे, कदम वस्ती आहे. जेसीबीच्या साहाय्याने डम्पिंग करत असताना त्याची प्रचंड दुर्गंधी नागरिकांना सहन करावी लागत आहे. सध्या सायंकाळनंतर दररोज कचरा जाळण्याचे प्रमाण वाढल्याने पसरत असलेल्या धुराचे लोळ व दुर्गंधीमुळे नागरिकांचे घराबाहेर पडणे मुश्कील झाल्याने अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यात रस्त्यावर आलेल्या कचºयाचे नदीच्या बाजूने ढीग लोटण्याचे काम एक-दोन दिवसाआड चालू असल्याने मुख्यगावात सायंकाळनंतर कुबट दुर्गंधी येत आहे. यामुळे लहान बालकांपासून तर आबालवृद्धांपर्यंत याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून, अनेकांना दम्याचा त्रास सुरू झाला आहे. यामुळे पाण्यातूनदेखील संसर्गजन्य आजार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सदर डम्पिंग ग्राउंडविषयी प्रशासनाने गांभीर्याने विचार करून त्वरित पावले उचलण्याची विनंती आता नागरिक करू लागले आहेत. जेणेकरून दररोज उद्भवणाºया त्रासापासून सुटका होईल.गंभीरआजारांना निमंत्रणसदर ठिकाणाला लागून वसाहती असून, त्यात अनुसया पार्क व त्याच्याजवळील परिसर, सरकारवाडा, ओम गुरुदेव चाळ, तानाजी चौक, चांदणी चौक, शिवाजी रोड, मारुती वेस, सायखेडा फाटा, राजवाडा आदी ठिकाणच्या रहिवाशांना सायंकाळी बाहेर पडणे मुश्कील होऊन बसले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे दूषित धुराचे पसरणारे लोळ अन् त्यात उडणारा ठसका अनेकांना गंभीर आजारांना निमंत्रण देईल हे निश्चित आहे. त्यामुळे वेळीच या सर्व गोष्टींचे नियोजन केल्यास भविष्यात अडचण निर्माण होणार नाही.जिथे कचरा डम्पिंग होतो त्याच्या समोरच आम्ही राहतो. पूर्वी याचा काहीएक त्रास होत नव्हता, परंतु मागील एक वर्षापासून नागरिकांचे जगणे मुश्कील होऊन बसले आहे. मच्छरांचा प्रचंड त्रास होतो. घरातील लहान बालक व वृद्धांना श्वास घ्यायला त्रास होतोय. अनेकदा तेथील लोकांना विनंती केली परंतु उपयोग होत नाही. वाढत्या आरोग्य खर्चाचा विचार करता याबाबींचा आमच्या आरोग्यावर घातक परिणाम व्हायला नको इतकेच.- अनिल सोमासे, ओझर
कचरा डेपो बनला घातक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 1:21 AM
ओझर : सध्या ओझरमधील सर्वाधिक चर्चेचा मुद्दा उपस्थित होतोय तो म्हणजे कचरा डेपोमुळे होणाऱ्या त्रासाचा. येथे जुन्या सायखेडा रोडजवळील अनुसया पार्कला लागून असलेल्या कचरा डेपोच्या दुर्गंधीने अनेकजण हैराण झाले आहेत. त्यामुळे परिसरात आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
ठळक मुद्देओझर : दररोजच्या त्रासाने नागरिक त्रस्तआरोग्याचा प्रश्न ऐरणीवर