सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्याच्या पूर्वभागात दीड महिन्यापासून गॅस सिलिंडरची गाडी न आल्याने ऐन दिवाळीत मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागल्याने परिसरात संतापाची लाट निर्माण झाली आहे.इगतपुरी तालुक्यात गॅसच्या समस्येबाबत नेहमीच त्रास होत आहे. भारत रेडिओ कंपनीची एजन्सी जाऊन सुविधा गॅस एजन्सीकडे कारभार आला; पण त्यामुळे असुविधाच निर्माण झाली. सुमारे तीन महिने गाडी येत नव्हती यामुळे ग्राहकांना खूपच त्रास झाला. ग्रामस्थांनी काही राजकीय पदाधिकाऱ्यांना सांगून गाडी सुरू केली होती. आता सणासुदीमध्ये गॅस नसल्याने महिलावर्गाची फारच तारांबळ झाली. ही गॅस सेवा विनाअट कोणतेही शुल्क न आकारता कॅम्प येथील एजन्सीकडे वर्ग करावी, अशी मागणी रामचंद्र परदेशी, दिलीप परदेशी, राजू बेलगावकर यांनी केली असून, या प्रकारचे निवेदन नवनिर्वाचित आमदार राजाभाऊ वाजे यांना देणार असल्याचे परदेशी यांनी सांगितले. (वार्ताहर)
इगतपुरीच्या पूर्वभागात गॅसटंचाई
By admin | Published: October 30, 2014 10:51 PM