पंचवटी : ग्राहकांना घरगुती सिलेंडर पोहोचविण्याचे काम करणाऱ्या परिसरातील भारत गॅस एजन्सीच्या वितरकाकडे काम करणाऱ्या चौघा डिलिव्हरी बॉयला आडगाव पोलिसांनी भरलेल्या गॅस सिलिंडरमधून गॅस चोरी करताना रंगेहात पकडले. त्यांच्याकडून घरगुती वापराचे हजारो रुपये किमतीचे तब्बल 29 सिलेंडर तसेच गाडी असा सुमारे अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. काल शनिवारी (दि.2) विडीकामगार नगर गंगोत्री विहार परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे. गॅस चोरी करणारे संशयित आडगाव शिवारातील अमृतधाम परिसरातील रहिवासी आहे.याबाबत आडगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बिजली यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश पाटील, हवालदार मुनीर काजी, विनोद लखन विजय सूर्यवंशी वाल्मीक पाटील नकुल जाधव असे गंगोत्री विहार परिसरात गस्त घालत असताना रस्त्याच्या कडेला एक पिवळ्या रंगाची रिक्षा क्रमांक (एमएच 15 इजी 4779) संशयास्पद उभी असताना पोलिस कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी धाव घेऊन पाहणी केली असता संशयित आरोपी राजेंद्र गजेंद्र उर्फ गजानन मोहिते, गजानन कैलास ढाले, मधुकर तुकाराम कोसे, आनंदा गजेंद्र उर्फ गजानन मोहिते सर्व राहणार विडीकामगार नगर सावित्रीबाई झोपडपट्टी अमृतधाम असे एका लोखंडी पाईपच्या सहाय्याने भरलेल्या गॅस सिलेंडर मधून रिकाम्या सिलेंडर मध्ये ट्रान्सफर करत असल्याचे आढळून आले.ज्वलनशील पदार्थ बाबतची कृती ही मानवी जीवितास व मालमत्तेस धोका निर्माण होईल असे कृत्य करत असताना पोलिसांनी त्यांना रंगेहात पकडले आहे संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी भरलेल्या सिलेंडर मधून रिकाम्या सिलेंडर मध्ये पाइपच्या सहाय्याने गॅसची चोरी करत असल्याची कबुली पोलिसांना दिली त्यांच्याविरुद्ध जीवनावश्यक कायदा वस्तू कलम 3 व 7 भादवि 285, 286 अन्वये गुन्हा दाखल करण्यात येऊन अटक केली आहे. तपासात गॅस सिलेंडर चोरी करणारे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आडगाव पोलिसांनी वर्तविली आहे.
भरलेल्या सिलिंडरमधून गॅस चोरी : चौघांना अटक, 29 सिलिंडर जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2019 2:21 PM
ज्वलनशील पदार्थ बाबतची कृती ही मानवी जीवितास व मालमत्तेस धोका निर्माण होईल असे कृत्य करत असताना पोलिसांनी त्यांना रंगेहात पकडले आहे संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी भरलेल्या सिलेंडर मधून रिकाम्या सिलेंडर मध्ये पाइपच्या सहाय्याने गॅसची चोरी करत असल्याची कबुली
ठळक मुद्देअडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त गॅस सिलेंडर चोरी करणारे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता