पाथरे : सिन्नर तालुक्यातील पाथरे विद्यालयास माजी विद्यार्थी संघाकडून एक लाख रुपये किमतीचे शैक्षणिक साहित्य भेट देण्यात आले. विद्यार्थ्यांना जलदगतीने ज्ञान उपलब्ध व्हावे, यासाठी माजी विद्यार्थी संघाने प्रोजेक्टर, लॅपटॉप, होमथिएटर अशा अत्याधुनिक सुविधांनीयुक्त डिजिटल क्लासरूमची उभारणी केली आहे. डिजिटल क्लास्रुमच्या भिंतींना आकर्षक रंगरंगोटी करण्यात आली आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना मोठ्या पडद्यावर अभ्यासाचे धडे गिरवणे शक्य होणार आहे. याशिवाय क्रिकेटचे दोन कीट, टेनिस खेळाचे साहित्य, हॉलीबॉल, पासिंग बॉल, नेट, शटल कॉक, टेनिस नेट, दोऱ्या, रिंग आदि क्रीडा साहित्यही विद्यालयास उपलब्ध करून देण्यात आले. यावेळी माजी विद्यार्थी संघाच्या पदाधिकाऱ्यांसह पाथरे खुर्द, पाथरे बुद्रूक व वारेगाव येथील सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य, प्राचार्य विद्या साळुंखे, पर्यवेक्षक नामदेव कानसकर, उत्तम खैरनार, रंगनाथ चिने, रमेश गडाख, सीताराम रानडे, किरण कुलकर्णी, संजय शेलार, सुनीता शिंदे, कृष्णाजी घोटेकर, भारती खंबाईत, प्रशांत दातरंगे, सुदाम भारमल आदिंसह विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते. (वार्ताहर)
पाथरे विद्यालयास शैक्षणिक साहित्य भेट
By admin | Published: February 11, 2017 11:54 PM