ममदापुर : येथील मेळाचा बंधाऱ्याला पाण्याची अडचण निर्माण झाली आहे. गेल्या पन्नास वर्षापासून निवडणुकीचा मुद्दा म्हणून वापर केलेला मेळाचा बंधारा आणखी काही दिवस वनविभागाच्या कचाट्यात अडकणार आहे.ममदापूर, राजापूर, सोमठाणजोश, खरवंडी, देवदरी, रहाडी ,रेंडाळा या गावांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावणारा बंधारा वनविभागाच्या किरकोळ कचाट्यात अडकला आहे. मेळाचा बंधारा परिसरात लघु पाठबंधारे विभागाने पूर्वी मोजणी करून तयार केलेल्या निशाण्या स्पष्ट दिसत नसल्याने वनविभागाचे किती क्षेत्र पाण्यात खाली जाते. हे स्पष्ट होत नसल्याचे मत वनविभागाचे मुख्य उपवन संरक्षक शिवबाला यांनी व्यक्त केले.सदर प्रकरण फेटाळून लावले आहे. प्रत्येक पाच वर्षांनी निवडणुका जवळ आल्यानंतर सगळ्याच राजकीय पक्षाकडून मेळाच्या बंधाºयासाठी आश्वासनांची खैरात करण्यात येते चार वर्षापूर्वी पालक मंत्री तथा तालुक्याचे आमदार छगन भुजबळ यांनी सदर मेळाण्याच्या बंधार्यासाठी साडेसहा कोटी रु पया चा निधी नियोजन आयोगातून तरतूद करून मेळाच्या बंधार्यासाठी राखीव ठेवला होता .तसेच सदर कामाचे टेडर देखील काढण्यात आले होते. परंतु पुढे काही एक झाले नाही.सदर कामा ची निविदा देखील निघाली होती परंतु त्यावेळी जमीन हस्तांतरण बाकी असल्याने इतके दिवस काम रेंगाळले होते परंतु नतंर नांदगाव तालुक्यातील वडाळी येथील जमीन वनविभागाला हस्तांतरित करण्यात आली आहेत. आता प्रश्न फक्त ममदापूर येथील मेळाचा बंधारा बाधंल्या नंतर किती जमीन पाण्याखाली जाते याचे चित्र स्पष्ट दिसत नसल्याने सदर अधिकार्यांनी तसा अहवाल दिल्याने आता या बंधाºयाच्या कामाला आणखी उशीर होणार आहे.ममदापूर येथील या बंधाºयात वन विभागाची २२ हेक्टर क्षेत्र जाणार असून क्षेत्र स्पष्ट दिसत नसल्याने लगेचच लघु पाठबंधारे विभागाने या ठिकाणी नवीन निशाणी तयार केल्या आहेत. तसेच ममदापूर येथील हा बंधारा तयार झाल्यानंतर येथे ४० दशलक्ष घनफूट पाणी साठणार आहे. त्यामुळे राजापूर, ममदापूर, सोमठाणजोश, खरवंडी, रहाडी, देवदरी, कोळगाव, रेंडाळा या गावांचा पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहेत.तरीदेखील उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनलेला असतो.वनविभागाला देखील ममदापूर येथील मेळाच्या बंधाºयाची नितांत गरज असून याप्रकरणी वनविभागाने देखील सकारात्मक भूमिका घेऊन ममदापूर येथील मेळाच्या बंधाºयासाठी त्वरीत परवानगी देऊन सहकार्य करावे असे परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांची मागणी आहे.(फोटो २७ बंधारा)
मेळाच्या बंधारा अडकला वनविभागाच्या कचाट्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2019 10:42 PM
ममदापुर : येथील मेळाचा बंधाऱ्याला पाण्याची अडचण निर्माण झाली आहे. गेल्या पन्नास वर्षापासून निवडणुकीचा मुद्दा म्हणून वापर केलेला मेळाचा बंधारा आणखी काही दिवस वनविभागाच्या कचाट्यात अडकणार आहे.
ठळक मुद्दे उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनलेला असतो.