सातपूर : कारखान्यात आपत्कालीन परिस्थिती उद््भवल्यास काय उपाययोजना करता येईल त्यासाठी वर्षभरात मल्टिसिनॅरियो मॉकड्रिल घेणाऱ्या कंपन्यांना व अधिकाऱ्यांना औद्योगिक आरोग्य व सुरक्षा संचालनालयाच्या वतीने गौरविण्यात आले.औद्योगिक आरोग्य व सुरक्षा संचालनालयाच्या सातपूर येथील कार्यालयात या कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपसंचालक डी. आर. खिरोडकर, जिल्हा प्रशासन आपत्कालीन विभागाचे प्रशांत वाघमारे, निमाचे उपाध्यक्ष शशिकांत जाधव, धनंजय जामदारमार्गचे चेअरमन नॉबर्ट डिसूझा उपस्थित होते. औद्योगिक आरोग्य व सुरक्षा संचलनालयाच्या वतीने कारखान्यांना देण्यात येणाºया कै. नारायण मेघाजी लोखंडे पुरस्कारासाठी उत्कृष्ट परीक्षक म्हणून काम करणाºया बॉश कंपनीचे सुरक्षा व्यवस्थापक प्रेमप्रकाश शर्मा, महिंद्र कंपनीचे सुरक्षा व्यवस्थापक सचिन मोरे, प्रशांत देवरे, धुळे येथील आंधीश सिंग यांना सहसंचालक देवीदास गोरे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन मोरे यांनी केले. उपसंचालक डी. आर. खिरोडकर यांनी आभार मानले. यावेळी जे. के. शिंदे, पी. आय. शर्मा, सुधीर आवळगावकर आदींसह विविध कारखान्यांतील सुरक्षा व्यवस्थापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.विविध उपक्रमांची माहितीऔद्योगिक आरोग्य व सुरक्षा संचालनालनालयाचे सहसंचालक देवीदास गोरे यांनी वर्षभरात राबविण्यात आलेल्या उपक्र मांची माहिती दिली. कारखान्यात आपत्कालीन परिस्थिती उद््भवल्यास काय उपाययोजना करता येईल? याबाबत हिंदुस्थान पेट्रोलियम, महिंद्र कंपनीत घेण्यात आलेल्या मॉकड्रिलची माहिती दिली.
औद्योगिक सुरक्षा विभागातर्फे गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2019 1:12 AM