नाशिक : विसा कार रॅलीच्या दुसऱ्या दिवशीही गौरव गिलने आपले वर्चस्व कायम ठेवत दुसऱ्या दिवशी ९ मिनिटे ४३ सेकंदाची वेळ नोंदविली आहे. सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास सगळ्या गाड्या सिटी सेंटर मॉलमधून निघाल्या. २७ स्पर्धकांपैकी २३ स्पर्धकच स्पर्धेत उतरल्याने गाड्यांचा क्रम बदलावा लागला. स्पर्धेतून चार स्पर्धकांनी माघार घेतल्याने क्रम बदलावा लागला असून, प्रत्येक खेळाडूंच्या कामगिरीवर क्रम निश्चित करण्यात आला. दरम्यान, गौरवने स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी अल्फा स्टेजमध्ये ९ मिनिटे ४३ सेकंद इतकी वेळ नोंदवली. पहिल्या दिवशीच्या पहिल्या फेरीत ९ मिनिटे ३९ सेकंद, तर दुसऱ्या फेरीत ९ मिनिटे ४४ सेकंद इतकी वेळ होती. आज त्या दोन्हीच्या मधली वेळ नोंदवत आपली आघाडी त्याने कायम राखली. अमितरजीतने मात्र त्याच्या वेळेमध्ये कमालीची सुधारणा दाखिवली. कालच्या दोन्ही फेऱ्याच्या वेळी प्रत्येकी १० मिनिटे ४ सेकंद आणि १० मिनिटे ११ सेकंद वेळ दिली असताना आज अमितरजीतने ९ मिनिटे ४५ सेकंद इतकी वेळ देऊन गौरवच्या काही फरकानेच मागे असल्याचे दाखवून दिले. आठव्या स्टेजनंतरही गौरवने कालच्या तुलनेत थोडी जास्त वेळ दिली असली तरी, आघाडी सोडली नाही. एकूणच स्पर्धेचे जवळ जवळ १०० किमी अंतर पार होत असताना महिंद्रा टीमचे दोन्ही स्पर्धक पहिल्या दोन्ही स्थानावर वर्चस्व राखून आहेत.
विसा रॅलीत गौरव गिलचे वर्चस्व कायम
By admin | Published: June 14, 2015 1:52 AM